15 फेब्रुवारीपर्यंत चालणार दुरुस्ती
पणजी : मांडवी नदीवरील जुन्या पुलाला दुऊस्तीची आवश्यकता असल्याने रस्ता डांबरीकरण तसेच पुलाच्या इतर डागडुजीसाठी शुक्रवार 31 जानेवारीपासून जुन्या मांडवी पुलावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. ही वाहतूक नव्या मांडवी पुलावरून वळविण्यात येण्यासंबंधीची अधिसूचना सार्वजनिक बांधकाम खात्याने काल बुधवारी काढली आहे. दि. 31 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान या पुलाचे काम करण्यात येणार आहे. सर्व वाहनांसाठी जुना मांडवी पूल बंद ठेवण्यात येणार आहे.









