इटलीच्या एका निर्जवर बेटावर 30 वर्षांपेक्षा अधिक काळ घालविणारे 85 वर्षांचे वृद्ध मौरो मोरांडी यांचा मृत्यू झाला आहे. हा वृद्ध 30 वर्षांपेक्षा एका निर्जन बेटावर राहत होता. यादरम्यान त्याने बेट स्वच्छ ठेवले होते. परंतु तो बेट सोडून मुख्य प्रवाहात राहण्यासाठी येताच अधिक काळ जिवंत राहू शकला नाही. या वृद्ध मौरोची कहाणी अचंबित करणारी आहे. इटलीच्या निर्जन बेटावर मौरो मोरांडी यांनी सुमारे 32 वर्षे वास्तव्य केले. त्यांच्या उत्कृष्ट कार्यांसाठी त्यांचे नाव माध्यमांनी ‘रॉबिन्सन क्रूसो’ ठेवले होते. ते दुसऱ्या महायुद्धाच्या जुन्या शेल्टर, सार्डिनिया नजीक बुडेली बेटावर एकटेच जगत होते. बुडेली भूमध्य समुद्रात एक इटालियन बेट आहे. 1989 मध्ये भांडवलशाही आणि समाजापासून दूर राहण्यासाठी पोलिनेशिया करत होते. याचदरम्यान ते या बुडेली बेटावर पोहोचले होते.
बेटाच्या देखभालीची जबाबदारी
या बेटावर पोहोचताच त्यांना तेथील केअरटेकर निवृत्तीच्या समीप असल्याचे कळले. याचमुळे त्यांनी केअरटेकरच्या निवृत्तीनंतर बेटाच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारली. स्वत:च्या प्रयत्नांमुळे त्यांना एक किंवा दोन नव्हे तर तब्बल 32 वर्षांपर्यंत या बेटावर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली.
पर्यटकांना केले जागरुक
मौरो मोरांडी यांनी 32 वर्षांच्या कालावधीत बेटाला स्वत: स्वच्छ ठेवले आणि तेथे येणाऱ्या पर्यटकांनाही बेटाच्या साफसफाईविषयी जागरुक केले. 2021 मध्ये या बेटाला नेचर पार्क घोषित करण्यात आले तेव्हा इटलीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तेथून हटविले. ज्या मोरांडी यांनी 32 वर्षांपर्यंत या बेटाला स्वच्छ ठेवण्यास स्वत:चे जीवन खर्ची घातले, त्यांना हटविण्यास अधिकाऱ्यांनी वेळ घेतला नाही.
अपार्टमेंटमध्ये होते राहत
बेटावरून परतल्यावर त्यांनी सार्डिनियाच्या ला मदालेनामध्ये एक अपार्टमेंटमध्ये नवी सुरुवात केली. सुंदर बेटावर 32 वर्षे वास्तव्य केल्यावर ते इतर लोकांदरम्यान मुख्य प्रवाहात परतले होते. जेव्हा त्यांना बेटावरून निघून जाण्यास सांगण्यात आले तेव्हा त्यांच्याकडे स्वत:चे घर नव्हते. नंतर सरकारने त्यांना सार्डिनियाच्या एका बेटसमुहातील ला मदालेना येथे पाठविले होते.









