बेंगळूर :
उत्सवी काळाचा विचार करून ओला इलेक्ट्रिक कंपनीने ग्राहकांना वाहनांचे वितरण (डिलिव्हरी)लवकरात लवकर करण्याच्यादृष्टीने उपाययोजना केल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आधीच्या वेळेच्या तुलनेमध्ये निम्म्या वेळेमध्ये ओला इलेक्ट्रिक वाहनाचे वितरण ग्राहकांना करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे. उत्सवीकाळामध्ये वाहनांच्या वाढत्या मागणीचा विचार करून कंपनीने उत्पादन वाढीवरती अधिक लक्ष केंद्रित केले आहे. सध्याला कंपनीला एखाद्या ग्राहकाला वाहनाचे वितरण करायचे असेल तर त्याकरीता 12 ते 14 दिवसांचा अवधी लागतो आहे. हा कालावधी निम्म्यावर आणण्याचे प्रयत्न येत्या काळात दिसून येणार आहेत. ग्राहकांना जास्त काळ वाट पाहावी लागू नये किंवा थांबावं लागू नये या अनुषंगाने हा बदल कंपनीने केला आहे.









