मुंबई :
इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रातील कंपनी ओला इलेक्ट्रिकचा समभाग 5 टक्के इतका वाढला आहे. कंपनीच्या विविध केंद्रांवर घालण्यात आलेल्या धाडीमुळे समभागांवर परिणाम पहायला मिळाला होता. मात्र शुक्रवारी समभाग 5 टक्के इतका वाढत 54 रुपयांवर पोहोचला होता.
फेब्रुवारी 2025 मध्ये विक्रीबाबतचा अहवाल चुकीचा देण्यात आल्यासंदर्भात कंपनीने खुलासा केला आहे. दुचाकींची विक्रीही मजबूत राहिलेली असून तात्पुरत्या काही अडचण्या आहेत. त्यासंदर्भात विक्रेत्यांशी आपण चर्चा करत असल्याचे कंपनीचे संस्थात्मक भावेश अगरवाल यांनी म्हटले आहे. केंद्रिय परिवहन आणि महामार्ग रस्ते प्राधिकरणासह 4 राज्याच्या प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या चौकशीला कंपनी योग्य ते उत्तर देत आहेत.









