नवी दिल्ली :
ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे शेअर्स गेल्या दोन दिवसांत 12 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहेत. शुक्रवारी दुपारी 2:30 वाजता ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स 6 टक्क्यांनी घसरून 60 रुपयांवर आले. गुरुवारी हा शेअर 64 रुपयांवर बंद झाला. 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 46 टक्के परतावा दिला. या काळात शेअरमध्येही जोरदार तेजी होती.
5 सप्टेंबरच्या घसरणीचे मुख्य कारण म्हणून ती बातमी मानली जात आहे. ज्यामध्ये असे म्हटले जात आहे की, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीमधील एसव्हीएफ ऑस्ट्रिच डीई एलएलसीने 2.15 टक्क्यांनी हिस्सेदारी विकली आहे. सॉफ्ट बँकेकडे सध्या ओला इलेक्ट्रिक कंपनीमध्ये 15.68 टक्क्यांची हिस्सेदारी आहे.
गोल्डमन सॅक्स ब्रोकरेजने लक्ष्य वाढवले
या बाजारातील बातम्यांदरम्यान, जगप्रसिद्ध ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने देखील ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्सवरील खरेदी रेटिंग कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.









