मागील वर्षीच्या तुलनेत तोटा 23 टक्क्यांनी वाढला : महसूल 896 कोटींवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीने 2025-26 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 428 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 347 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कंपनीचा तोटा वर्ष-दर-वर्ष आधारावर 23 टक्क्यांनी वाढला आहे.
कंपनीने सोमवार तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसुलाबद्दल बोलायचे झाले तर एप्रिल-जून तिमाहीत तो 828 कोटी रुपये झाला आहे. हा आकडा वर्षाच्या आधारे पाहिल्यास तो तो 49.64 टक्क्यांनी कमी झाला आहे. कंपनीने गेल्या वर्षी याच तिमाहीत 1,644 कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता.
कंपन्यांचे निकाल दोन भागात येतात. स्टँडअलोन आणि कन्सोलिडेटेड. स्टँडअलोन फक्त एकाच युनिटची आर्थिक कामगिरी दर्शवते. तर, संपूर्ण कंपनीचा अहवाल एकत्रित आर्थिक अहवालात दिला आहे. निकालांनंतर ओलाच्या
शेअरमध्ये 15 टक्क्यांची वाढ
2026 च्या पहिल्या तिमाहीच्या निकालानंतर ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स सोमवार, 14 जुलै रोजी 15 टक्क्यांनी वाढले. दुपारी 1 वाजता ते 46 रुपयांवर व्यवहार करत होते. गेल्या 5 दिवसांत ते 9.36 टक्क्यांनी वर पोहोचले आहे.









