भेंडीची भाजी नेहमी चिकट होत असल्याने ती अनेकजणांना आवडत नाही. लहान मुलेही भाजी खाण्यास टाळाटाळ करतात. पण जर काही छोट्या ट्रिक्स फॉलो केल्यास भेंडी एकदम कुरकुरीत आणि मोकळी होईल. अशी ही क्रिस्पी भाजी सगळेच जण आवडीने खातील. एवढेच नाही तर अशा प्रकारे तयार केलेली भाजी मुलांनाही आवडेल. चला तर मग जाणून घेऊया भेंडी भाजीचा चिकटपणा कसा कमी करावा.
भेंडी धुतल्यानंतर लगेच कापू नये. नेहमी भेंडीवरील ओलावा कोरडा करावा. भेंडी धुतल्यानंतर कपड्याने पाणी चांगले कोरडे करा. शक्य असल्यास भेंडी साधारण एक ते दोन तास आधी धुवून ठेवावी. जेणेकरून त्याचे सर्व पाणी सुकून जाईल. अन्यथा हे पाणी भेंडीमध्ये मिसळल्याने ते जास्त चिकट होईल.
भेंडी कापताना छोटे तुकडे करु नका. नेहमी मोठे तुकडे करा. जेणेकरून भेंडीतून चिकटपणा कमी येतो.
भेडीचे मोठे तुकडे तेलात तळल्याने भेंडीचा श्लेष्मा सुकतो आणि ते कुरकुरीत होते.
भेंडीची भाजी बनवताना त्यात लिंबाचा रस किंवा दही घाला. जर तुम्ही भेंडीची कोरडी भाजी बनवत असाल तर लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर टाकल्यास भेंडी कुरकुरीत होईल. दुसरीकडे, रस्सा भाजीसाठी दही किंवा चिंचेचे पाणी भेंडीचा चिकटपणा काढून टाकण्यास मदत करेल.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









