नवी दिल्ली
ऑइल इंडियाने 38 लाख टन तेल उत्पादनाचे ध्येय निश्चत केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उर्जा उत्पादक ऑइल इंडिया लिमिटेड आसाम आणि राजस्थानमधील अनेक नवीन विहिरी आणि वायू क्षेत्रांमधून उत्पादनाची अपेक्षा करत आहे, त्यामुळे कंपनी चालू आर्थिक वर्षात 3.8 लाख टन कच्च्या तेलाचे उत्पादन करू शकणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजीत रथ यांनी ही माहिती देताना म्हटले आहे की, नवीन ध्येय 2022-23 च्या उत्पादनापेक्षा 20 टक्क्यांनी जास्त आहे. आसाम ऑइल कंपनीला उत्पादन वाढीच्या करारांतर्गत तीन गॅस फील्ड कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
ऑइल इंडियाने 2040 पर्यंत शून्य उत्सर्जन साध्य करण्यासाठी सुमारे 25,000 कोटी रुपये (3.38 अब्ज डॉलर) गुंतवण्याची योजना आखली आहे. कंपनी 2जी इथेनॉल सेगमेंटमध्ये 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.
…









