संजय खूळ,इचलकरंजी
मोटर रेसिंग स्पर्धेत जगात लक्षवेधी ठरत असलेल्या ओहवाले बाईक कंपनी च्या टॅलेंटे सिलेक्शन मध्ये अ.लाट (ता. शिरोळ )येथील तेरा वर्षाचा जिनेन्द्र किरण सांगावे यांनी प्रथम फेरी मधील दोन्हि स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावीला.वर्ड चॅम्पियनशिप मिनी जी. पी साठी निवड चाचणी चालू आहे.यासाठी जगभरात देशातील 10 ते 14 वयोगटातील टॉप आणि फास्टेस्ट रायडर यांची निवड चाचणी होत आहे. यात जिनेन्द्र सांगावे याची भरारी देशात भारी ठरत आहे.
वर्ड मोटो जी पी स्पर्धेतील ओवाले बाईक ही नामांकित कंपनी असून भारतात पहिल्यांदाच यांनी प्रवेश केला आहे. खास मुलांसाठी या रेसिंग बाईक बनवले असून लहान आकाराच्या पण मोठ्या गाड्यांच्या सर्व फॅसिलिटी उपलब्ध असलेली बाईक आहे.दिसायला जरी लहान असेल तरी मोठ्या गाड्यांपेक्षा जास्त ताकतवान असल्याने बाईक हाताळण्याच्या पद्धती देखील वेगळ्या आहेत.
भारतात ओहवाले मिनी जी.पी च्या पाच राऊंड स्पर्धा होणार असून या पाच स्पर्धेमधील अंतिम निकाल मध्ये प्रथम आणि द्वितीय अशा रायडरला इटली आणि स्पेनला जाण्याची संधी मिळणार आहे. बेंगलोर आणि हैदराबाद येथे पुढील स्पर्धा पार पडणार आहेत. या स्पर्धेसाठी जिनेन्द्र सांगावेसह भारतातील सध्याचे १४ नामवंत खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. २७ जून २२ रोजी प्राथमिक चाचणीमध्ये जिनेन्द्र हा सर्वात फास्टेस्ट टाईम लॅपर आहे . भारतात होणाऱ्या पाच राऊंड पैकी पहिली राउंड मेको कार्टोपिया बेंगलोर येथे पार पडली.
या दोन्ही स्पर्धेत जिनेन्द्रला रेस स्टार्ट खराब मिळून देखील 15 फेरी च्या रेस मध्ये ७ व्या फेरीलाच अत्यंत जलद गतीने पकड मिळवून ती शेवटपर्यंत कायम ठेवण्यास यश मिळवले. दोन्ही स्पर्धा खूपच आक्रमक आणि धोकादायक रीतीने पार पडल्या. परंतु जिनेन्द्रने त्यांच्या प्रतिस्पर्धी रायडरच्या अटॅक पोझिशनला उत्कृष्ट कौशल्याने डिफेन्स करत कोणालाही धक्का न लावता रेस पार केल्याबद्दल आयोजक आणि उपस्थित प्रेक्षकांकडून कौतुक झाले.
स्पर्धेचे इटालियन आयोजक मार्को आणि जिनेन्द्र चे स्पॉन्सर एक्सर हेल्मेट, रेस डायनामिक इंडिया अरुण ग्रेड मोहित रेसिंग अकॅडमी, आवाडे मोटर्स स्पोर्ट्स, न्यू इंग्लिश स्कूल लाट, यांचेसह श्रीकांत चव्हाण, रियाज सर, दिलावर सर , यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच टीव्हीएस रेसिंग टीम कडून देखील महत्वाचे सहकार्य मिळाले या सर्वांचे जिनेन्द्र चे काका सागर सांगावे यांनी आभार मानले.