मुंबई : आजपर्यंत इंग्रजांनी दिलेला शब्द उपयोगात आणलाय… मी फोन उचलल्याबरोबर ”हॅलो” म्हणतो. हा देश जेव्हा गुलामगिरीत होता, तेव्हा त्यांनी हा शब्द दिलेला होता. स्वातंत्र्यवीरांनी वंदे मातरम म्हणत तिरंगा हातात घेऊन, या देशाचं स्वातंत्र्य मंगलकलशाच्या रुपाने दिलं. पण अजूनही इंग्रजांची छाप काही कमी होत नाही. म्हणून आज सांस्कृतिक विभागाच्या मंत्रालयाचा मंत्री म्हणून पहिला निर्णय जाहीर करतोय, आता हॅलो नाही… वंदे मातरम बोलायचं….! असं म्हणत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री होताच पहिला निर्णय जाहीर केला. त्यामुळे सर्व शासकीय अधिकाऱ्याना फोन उचलल्यावर वंदे मातरम म्हणावं लागेल.
काय म्हणाले मुनगंटीवार?
“देशभक्ती १ जानेवारी ते देश ३१ डिसेंबर पर्यंत संपणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपण आजपर्यंत इंग्रजांनी दिलेला शब्द उपयोगात आणला आणि तो म्हणजे, हॅलो…हा देश जेव्हा गुलाम होता तेव्हा स्वातंत्र्यवीरांनी वंदे मातरम म्हणत तिरंगा हातात घेऊन या देशाचं स्वातंत्र्य तुमच्या माझ्या हातात मंगल कलशाच्या रूपाने दिले. पण अजूनही इंग्रजांची छाप काही कमी होता होत नाही. म्हणून आज सांस्कृतिक विभागाचा मंत्री म्हणून पहिला संकल्प मी करतोय. इथून पुढं हॅलो ऐवजी महाराष्ट्रात वंदे मातरम बोललं जाईल. चांद्यापासून बांद्यापर्यंत हा निर्णय लागू असेल. १५ ऑगस्ट म्हणजेच उद्यापासून संकल्प सुरु होईल. तुम्ही सुद्धा प्रतिज्ञा करा की आता यानंतर मोबाईलवरही वंदे मातरम म्हणू, देशभक्तांचं गीत वंदे मातरम हे अभियान सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी पर्यंत आम्ही राबवणार आहोत. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आहे हे आपण सुरु करणार आहोत. पुढे हे देशभर जाईल. विश्वगुरु नरेंद्र मोदींनी तुमच्या माझ्या हातात तिरंगा दिला आहे. हा संकल्प आजपासून आपण सुरू करतोय. मी आपल्याला आवाहन करतो की आता कोणाचाही फोन आला, कोणाचाही मोबाईल आला, की वंदे मातरम म्हणायचं. महाराष्ट्र कहेगा वो ही देश कहेगा”
Previous ArticleKolhapur; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काळम्मावाडी धरणावर विद्युत रोषणाई
Next Article विजेचा शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू








