बेळगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बेळगाव व बैलहोंगल तालुक्यात विविध कामे सुरू आहेत. ग्रामीण विकास आयुक्त कार्यालयाचे तांत्रिक विभाग सहसंचालक पी. जी. वेणुगोपाल यांनी बुधवार दि. 11 रोजी कार्यस्थळावर जाऊन कामाची पाहणी केली. मुचंडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वन परिसरात नवीन तलावाचे बांधकाम सुरू आहे. वेणुगोपाल यांनी कार्यस्थळाला भेट देऊन रोहयो कामगारांशी संवाद साधला. सांडपाण्याचा निचरा करणाऱ्या व्यवस्थेची पाहणी करून तांत्रिक साहाय्यकांना काही सूचना केल्या. सांबरा परिसरातील अमृत सरोवर 2.0 ला भेट देऊन इनलेट व आऊटलेटची स्वच्छता करावी. सरोवराच्या काठाला चिपिंग करून बायोफेन्सिंग करण्याची सूचना संबंधित कंत्राटदारांना केली.
हलगा ग्राम पंचायत हद्दीत वनीकरण खात्यामार्फत पूर्ण केलेल्या रस्त्याच्या बाजूपट्यावरील सीसी कॅमेराची पाहणी केली. त्यानंतर, बस्तवाड ग्राम पंचायतीला भेट देऊन रोहयोअंतर्गत झालेल्या कामाची पाहणी केली. बस्तवाड ग्राम पंचायत आवारात आरडीपीआर खात्याच्या साहाय्यवाणीची सुऊवात करण्याची सूचना पीडीआंsना केली. कोंडसकोप येथील सरकारी प्राथमिक शाळा आवारात उभारण्यात आलेले स्वच्छतागृह, क्रीडांगण, स्वयंपाकगृह कामाची पाहणी केली. हिरेबागेवाडीत नव्याने बांधलेल्या ग्राम पंचायत इमारत, संपगाव (ता. बैलहोगल) येथील सांडपाणी व्यवस्था कामाची पाहणी करून ग्रामीण विकास आयुक्त कार्यालयाकडे सादर केलेल्या डीपीआरची फेरतपासणी करण्याची सूचना तांत्रिक कर्मचाऱ्यांना सूचना केली. बेळगाव व बैलहोंगल तालुका पंचायतीचे सहसंचालक बसवंत कडेमनी, साहाय्यक अभियंता विजय पाटील, तांत्रिक संयोजक मुऊगेश व नागराज, ग्राम पंचायत विकास अधिकारी, ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.









