तक्रारी निवारणासाठी मोबाईलसेवा उपलब्ध, लाभार्थ्यांना आवाहन
बेळगाव : सरकारने अन्नभाग्य योजना जारी केली आहे. याअंतर्गत बीपीएल रेशनकार्डधारकांना पाच किलो तांदळाऐवजी रोख रक्कम दिली जात आहे. जिल्ह्यात 11 लाखहून अधिक लाभार्थी आहेत. मात्र यापैकी काही लाभार्थ्यांची बँक खाती निष्क्रिय आहेत. अशा लाभार्थ्यांना अन्नभाग्य योजनेचा लाभ घेताना अडचणी येऊ लागल्या आहेत. किंवा काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली नाही, अशा तक्रारी येत आहेत. यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्याने अधिकारी व त्यांचे मोबाईल क्रमांक दिले आहेत. शिवाय या मोबाईल क्रमांकांवर तक्रारीबाबत संपर्क साधावा, असे आवाहनदेखील केले आहे. काँग्रेस सरकारने निवडणुकीदरम्यान पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली होती. त्यापैकी शक्ती योजना, गृहज्योती आणि त्यापाठोपाठ अन्नभाग्य योजनादेखील लागू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना माणसी 170 रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे. सरकारकडे तांदूळसाठा उपलब्ध नसल्याने तांदळाऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जात आहे. मात्र काही लाभार्थ्यांच्या बँक खात्याला आधारकार्ड लिंक नाही. तर काही लाभार्थ्यांची बँक खाती बंद आहेत. आधारकार्डमध्ये मोबाईल क्रमांक नाहीत. त्यामुळे खात्याला पैसे जमा करताना अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत लाभार्थ्यांसाठी अधिकारी आणि त्यांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
अन्नभाग्य योजनेबाबतच्या तक्रारी निवारणासाठी अधिकारी-मोबाईल क्रमांक
बेळगाव ग्रामीण
- माजिद उस्ताद 9844223455
- जे. बी. भागोजीकोप्प 9902068647
- सतीश बेनगी 9108752005
बेळगाव शहर
- एम. एम. गाणगी 9740103336
- आय. आय. मुनियार 9886234949
- पी. एम. पट्टणशेट्टी 9481913200
- व्ही. डी. दिवटगी 9008471369
खानापूर तालुका
- आनंद कोलकार 9880765787
- ए. एम. आरळीकट्टी 7338365396
हुक्केरी तालुका
- एल. बी. डांगे 9886484020
- इरफान उस्ताद 9964832383
गोकाक तालुका
- आय. बी. दयण्णावर 9448963323
- गीता र•sरहट्टी 8618220983
निपाणी तालुका
- अभिजीत गायकवाड 9886447557
अथणी तालुका
- ब्रिजमोहन अगरखेड 9448947125
- प्रताप रायकर 9964808427
- रझाक मुजावर 9008064684
कित्तूर तालुका
- व्ही. एन. शेबण्णावर 8310166039
कागवाड तालुका
संतोष बु•र 9632919595
रायबाग तालुका
- शरणाप्पा बागेवाडी 9880747329
- विनायक भाटे 9739355553









