तहसीलदारांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पूजन, मान्यवरांची उपस्थिती
खानापूर : शासकीय शिवजयंती येथील तहसीलदार कार्यालयात औपचारिकता म्हणून साजरी करण्यात आली. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी समिती नेते प्रकाश चव्हाण, मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, यशवंत बिरजे, बाळाराम सावंत, तालुका भाजपाध्यक्ष संजय कुबल, सुरेश शिंगे, आनंदराव पाटील, यासह तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. यासह नगरपंचायतीत मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक आणि कर्मचारी उपस्थित होते. तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, बस स्थानकासह सर्व ग्राम पंचायत कार्यालये तसेच शासकीय कार्यालयात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. येथील शिवस्मारक आवारातील शिवपुतळ्याला तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवस्मारक ट्रस्टचे अध्यक्ष एम. पी. पाटील, श्रीकांत दामले, प्रकाश चव्हाण यासह इतर शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश गायकवाड यांनी शिवस्मारकाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच शिवस्मारक ट्रस्टच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या वाचनालयाच्या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.









