Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Jayanti : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती. यानिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.आज सकाळी 8 वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कसबा बावडा इथल्या लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट देवून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच शाहू जन्म स्थळ आणि परिसराची पाहणी सुद्धा त्यांनी केली.यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,माजी पालकमंत्री सतेज पाटील,राज्यसभा खासदार धनंजय महाडिक,आमदार प्रकाश आवाडे,आमदार जयश्री जाधव,आमदार जयंत आसगावकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.याठिकाणी आज दिवसभर विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
Previous Articleतालुक्यात पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
Next Article कारवार तालुक्यात पाऊस









