Chinchwad Bypoll: चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अखेर उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर नाना काटे यांचे आज राष्ट्रवादीने अधिकृत नाव जाहीर केले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत याची माहिती दिली.
दरम्यान, सोमवारी दिवंगत लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप यांनी त्यांच्या निवासस्थानापासून पदयात्रेद्वारे शक्ती प्रदर्शन करत चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी थेरगाव येथील क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. पडताळणीमध्ये अश्विनी जगताप यांचा अर्ज बाद होवू नये म्हणून लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही निवडणुक अटीतटीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
Previous Articleमांद्रे चोरी प्रकरणी संशयिताला अटक
Next Article ‘दूधसागर’ नदी आटल्यास जबाबदार कोण?








