ताळगावात सायंकाळी होणार सन्मान सोहळा
पणजी : राज्यसभा निवडणुकीत गोव्यातून बिनविरोध निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार सदानंद शेट तानावडे यांना आज मंगळवारी सकाळी 10 वा. विधानसभा सचिवालयात अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6.30 वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ताळगाव कम्युनिटी सेंटर सभागृहात तानावडे यांच्या जाहीर सन्मानाचे आयोजन केले आहे. या जाहीर सत्कार सोहळ्यास राज्यातील भाजपचे तमाम पदाधिकारी, आमदार, मंत्री व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर रहाणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तानावडे यांना भेटावयास येणाऱ्यांनी पुष्पगुच्छ, भेटवस्तु, फळांची पेटी आणू नये असे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाला इतर पक्षांचे आमदार व अपक्ष आमदारही सहभागी होणार आहेत.









