मिरज :
अबावली दर्ग्याच्या कंपाऊंडलगत असलेली बेकायदेशीर अतिक्रमणे हटविताना महापालिका अतिक्रमण विभागाचे अधीक्षक दिलीप घोरपडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. अतिक्रमणधारकांनी शिवीगाळ व दमदाटी करत अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर अतिक्रमण कारवाई थांबवून महापालिका अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात धांव घेतली. याबाबत तक्रार दिली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दर्ग्याच्या कंपाऊंडलगत बेकायदेशीर अतिक्रमणे थाटली होती. सदर अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेकडून संबंधितांना नोटीसाही देण्यात आल्या होत्या. मात्र, दिलेल्या मुदतीत अतिक्रमण काढले नसल्याने शुक्रवारी सकाळी महापालिकेकडून कारवाई सुरू करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे अधीक्षक दिलीप घोरपडे हे जेसीबी व कर्मचाऱ्यांसह कारवाईस्थळी गेले. जेसीबीच्या सहायाने सर्व अतिक्रमणे हटविली. मात्र, एका पत्र्याच्या खोक्याची तोडफोड कऊन अतिक्रमण काढताना संबंधीत अतिक्रमणधारकांने कारवाई&ला विरोध दर्शवला.
संबंधीत तऊणाने दिलीप घोरपडे यांच्या अंगावर धावून जात कारवाई थांबविण्यास सांगितले. मात्र, अधिकाऱ्यांनी विरोध न जुमानता कारवाई सुरूच ठेवल्याने संबंधीत अतिक्रमणधारकासह तेथील काही तऊणांनी जमाव करत घोरपडे यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. या प्रकारानंतर घोरपडे यांच्यासह सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला व सर्व कर्मचारी शहर पोलिस ठाण्यात गेले. संबंधीत हल्लेखोरांविऊध्द तक्रार देऊन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याबाबत तक्रार घेऊन रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, अतिक्रमण कारवाईवेळी घोरपडे यांच्यावर सलग दुसऱ्यांदा हल्ला झाला आहे.








