ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नाशिक पालिकेतील कामगार सेना नेमकी कोणाची? यावरून शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात वाद पेटला आहे. या वादानंतर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत हे कार्यालय सील केले आहे.
महापालिकेतील शिवसेना प्रणित म्युन्सिपल कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तीदमे शिंदे गटात गेल्यानंतर कामगार सेना नेमकी कुणाची? यावरून वादाला सुरुवात झाली होती. तिदमे शिंदे गटात गेल्यानंतर ठाकरे गटाने त्यांची हकालपट्टी केली. त्यानंतर ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी कामगार सेनेची बैठक बोलवत स्वतःला कामगार सेनेचे अध्यक्ष म्हणून घोषित केलं. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाने महापालिकेतील कामगार सेनेचे कार्यालय अचानक ताब्यात घेतले. त्यानंतर हा ताबा बेकायदेशीर असल्याचे सांगत शिंदे गटाने पोलिसात तक्रार दिली.
अधिक वाचा : धक्कादायक! पुण्यात अवघ्या 13 महिन्यांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
पालिकेतील कामगार सेनेचे कार्यालय ताब्यात घेण्यावरून दोन्ही गटातील वाद चिघळत असतानाच पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत हे कार्यालय सील केले.