काही लोक रात्री प्रवास करणाऱ्यांसाठी एक रस्ता सुरक्षित नसल्याचे सांगतात. अशा स्थितीत दुर्घटना टाळण्यासाठी या रस्त्यावर लोक दगड अर्पण करत असतात. डूंगरपूरपासून 10 किलोमीटर अंतरावरील वैद्यकीय महाविद्यालयानजीक एक असा रस्ता आहे ज्याच्या कडेला दगडांचा ढिग लागला आहे. येथे ये-जा करणारा प्रत्येक जण येथे दगड अर्पण करत असतो, विशेषकरून रात्रीच्या वेळी प्रवास करणारा. येथे दगड अर्पण केल्याने रस्त्यावर दुर्घटना, तसेच लूट होण्याची घटना घडत नसल्याचे लोकांचे मानणे आहे. थाणा गावातील रस्त्यानजीक तुम्हाला दगडांचा ढीग दिसून येईल. या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी प्रवास करणारे लोक येथे थांबतात आणि दगड अर्पण करतात. येथे दगड अर्पण करण्यासाठी लोक अन्य ठिकाणावरुन दगड आणत असतात.

या दगडांच्या ढिगामागे अनेक कहाण्या प्रचलित आहेत. एका गृहस्थाने कर्ज घेतले होते. कर्जदाराने पैशांसाठी त्रास देण्यास सुरुवात केल्यावर या ठिकाणच्या झाडाखाली त्या गृहस्थाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून दररात्री झाडाच्या सावलीत या गृहस्थ दिसत असल्याची वदंता आहे. ग्रामस्थांनी त्या गृहस्थाच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मोठा होम करविला होता. तेव्हापासून येथे दगड अर्पण केले जात असल्याचे सांगण्यात येते. तर येथे आणखी एक अजब कहाणी प्रचलित आहे. पूर्वी हा रस्ता अपघातप्रवण होता, तेव्हा येथे दररोज अपघात व्हायचे. याचमुळे येथे एका इसमाचा अपघातात मृत्यू झाला होता. याच ठिकाणी त्याची समाधी तयार करण्यात आली, तेव्हापासून येथे दगड अर्पण करण्याची प्रथा सुरू झाल्याचीही कहाणी सांगण्यात येते.









