Offering silver ornaments to Wada Vimaleshwar temple
महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ, प्रवचन, किर्तन व पालखी प्रदक्षिणा
फणसे येथील शिवाजी गावकर व कांबळी अशा पाच बंधुंनी मिळून वाडा येथील पांडवकालीन श्री विमलेश्वर मंदिरातील शिवलिंगाला चांदीचे अलंकार बुधवारी अर्पण केले त्यांच्या दात्वृत्वाबद्दल वाडा ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने मंदिरात उपस्थित होते.वाडा विमलेश्वर मंदिराचा महाशिवरात्री उत्सव बुधवारपासून सुरू झाला असून २० फेब्रुवारीला या उत्सवाची सांगता होणार आहे. दशमीपासून प्रतिपदेपर्यंत हा उत्सव साजरा होतो. बुधवारी सकाळपासून विमलेश्वर मंदिराच्या उत्सवाला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी विमलेश्वराला चांदीच्या अलंकारांनी सजवून विधीवत पूजा करण्यात आली. महाशिवरात्री उत्सवामध्ये वाडा विमलेश्वर मंदिरात पडेल येथील श्रीकृष्ण घाटे यांचे दररोज प्रवचन असणार आहे. १५ व १६ फेब्रुवारी रोजी ह न. प. महेश बुवा काणे यांचे किर्तन १७ ते २० फेब्रुवारी या कालावधीत ह. भ. प. बासुदेव बुवा जोशी यांचे किर्तन. दररोज रात्री पालखी प्रदक्षिणा सोहळा हा भाविकांसाठी खारा आकर्षण सोहळा असणार आहे.
महाशिवरात्री यात्रोत्सवाच्या तीन दिवसांत मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी. येतात. विमलेश्वर मंदिर हे जागृत व पांडवकालीन मंदिर असल्याने या मंदिरात सतत भाविकांची वर्दळ असते महाशिवरात्री कालावधीमध्ये मंदिराचा पालखी सोहळा अत्यंत देखणा असतो. या सोहळ्याचा चित्रकरणासाठी अनेक युट्युबर येथे हजेरी लावतात. बिमलेश्वर मंदिर के बेवस्थान असले तरी हे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून सुध्दा प्रसिध्द आहे. या मंदिराच्या ठिकाणी अनेक मराठी चित्रपट व मालिकांचे चित्रीकरणाठी नेहमी सुरू असते.
प्रतिनिधी/देवगड









