, अल्पवयीनाला गोशाळेत सेवा करण्याची शिक्षा
वृत्तसंस्था/ मुरादाबाद
उत्तरप्रदेशच्या मुरादाबादमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी शिक्षा झाली आहे. ज्युवेनाइल जस्टिस बोर्डाने अल्पवयीन मुलाला 15 दिवसांपर्यंत गोशाळेत सेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे. याचबरोबर पुढील 15 दिवसांपर्यंत त्याला सार्वजनिक ठिकाणांची सफाई करावी लागणार आहे.
आरोपी मुलाने मुख्ययमंत्री योगींचे छायाचित्र एडिट करत त्यात प्रक्षोभक संदेशासोबत ते सोशल मीडियावर शेअर केले होत. याप्रकरणी त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याची किशोर सुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. मुलाचे वय कमी असल्याने आणि त्याच्याकडून अशाप्रकारचा गुन्हा पहिल्यांदाच घडल्याने समुदायाची सेवा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. याचबरोबर या मुलावर 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.









