यंदाची ‘आयपीएल’ सुरू झाल्यानंतर संभाव्य विजेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं होतं त्यामध्ये आघाडीवर नाव होतं ते सनरायझर्स हैदराबादचं…गेल्या वर्षीच्या स्पर्धेत त्यांच्या फलंदाजांनी अक्षरश: धुमाकूळ घालून प्रतिस्पर्धी गोलंदाजांमध्ये दहशत निर्माण केली होती. त्याशिवाय यंदा त्यांनी आपला माराही अधिक मजबूत केला होता. पण गत मोसमात अंतिम फेरीपर्यंत धडक मारलेल्या सनरायझर्सला त्या कामगिरीची पुनरावृत्ती करून दाखवणं सोडाच, ‘प्लेऑफ’साठी पात्र होणं देखील जमलं नाही. स्पर्धेतून सर्वांत आधी बाहेर पडणाऱ्या संघांमध्ये त्यांचा समावेश राहिला…
इतक्या स्फोटक चमूचं गणित बिनसलं तरी कुठं ?…
- सनरायझर्स हैदराबादनं या हंगामाची सुऊवात केली ती राजस्थान रॉयल्सविऊद्ध 6 बाद 286 धावा काढून. त्यानंतर ‘आयपीएल’मध्ये 300 धावांचा टप्पा पार करणारा तो पहिला संघ ठरेल काय याची चर्चा जोरात सुरू झाली होती…
- पण पहिल्या सामन्यात सनरायझर्सनी दाखवलेली चमक गायब होण्यास फारसा वेळ लागला नाही…सोमवारी म्हणजे 5 मे रोजीचा दिल्ली कॅपिटल्सविऊद्धचा सामना पावसात वाहून गेल्यानं प्लेऑफमध्ये जाण्याचे सारे दरवाजे त्यांच्यासाठी बंद झाले. हा एक मोठा धक्का होता, कारण दिल्लीला फक्त 7 बाद 133 धावांवर रोखल्यानं त्यांना विजय मिळविण्याची नामी संधी होती. अर्थात तो सामना जिंकला असता, तरी बाद टप्प्यात प्रवेशाची शक्यता निर्माण होणं कठीण होतं…
- अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश रे•ाr, हेनरिक क्लासेन…प्रत्येक आयपीएल संघाला हवेहवेसे वाटणारे फलंदाज. याशिवाय हैदराबादला मोठी फटकेबाजी करू शकणारा अनिकेत वर्मासारखा प्रतिभावान फलंदाज देखील गवसला. दुर्दैवानं या सर्व फलंदाजांनी एकाबरोबर फॉर्म गमावला…
- आयपीएलमध्ये एकदा अडचणीत आल्यानंतर त्यातून बाहेर पडणं अत्यंत कठीण होऊ शकतं. स्पर्धेपूर्वी उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या वरच्या फळीतील पाचही खेळाडूंची स्थिती पुढं इतकी वाईट होईल, अशी कुणीही कल्पना केलेली नसेल…यात जास्तच उठून दिसलं ते गेल्या वर्षी हैदराबादच्या तुफानी वाटचालीचा पाया घालणाऱ्या हेडचं अपयश…
- हैदराबादची अतिआक्रमक फलंदाजीची पद्धत यंदा बरीच चर्चेत राहिली अन् तीच त्यांच्या अंगलट आल्याचं मत व्यक्त झालंय. पण याच धोरणानं त्यांना गेल्या हंगामात अंतिम फेरीत पोहोचविलं होतं आणि प्रशिक्षक डॅन व्हेटोरी यांनी संपूर्ण मोसमात वारंवार ही बिनडोक आक्रमकता नाही हे ठासून सांगितलं…
- गतवर्षी हैदराबादची सर्वांत मोठी ताकद राहिली होती ती फलंदाजी. मात्र महालिलावात कर्णधार पॅट कमिन्सच्या साथीला मोहम्मद शमी, अॅडम झॅम्पा आणि हर्षल पटेलसारखे गोलंदाज करारबद्ध करून त्यांनी आपला माराही धारदार केला होता. पण प्रत्यक्षात झॅम्पा लगेच दुखापतग्रस्त झाला आणि तो खेळू शकला नाही, तर दुखापतीतून सावरलेला शमी त्याच्या सर्वोत्तम स्थितीत परतलेला नाही. त्यामुळं त्यांची गोलंदाजी कागदावर जितकी मजबूत दिसत होती त्यापेक्षा प्रत्यक्षात खूपच कमी प्रभावी राहिली…
- जेव्हा चेंडू बॅटवर सहज येतो आणि खेळपट्ठ्या पाटा असतात तेव्हा हैदराबादचे फलंदाज सर्वोत्तम कामगिरी करतात आणि अशा परिस्थितीत ते कुणालाही आडवे करू शकतात असं दिसून आलंय…इतर संघांनी हे ताडलं अन् त्यामुळं अनेक वेळा दूरस्थ सामन्यांमध्ये त्यांचं स्वागत झालं ते मुक्तपणे फटकेबाजी करता न येणाऱ्या खेळपट्ट्dयांनी. त्यामुळं सनरायझर्सच्या फलंदाजांची बरीच गोची झाली…खेरीज हैदराबादमधील मैदान सुद्धा गेल्या वर्षीप्रमाणं यंदा फलंदाजीचं नंदनवन राहिलं नाही…









