वृत्तसंस्था/ कोक्राझेर (आसाम)
103 व्या ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या फ गटातील सामन्यात ओडिसा एफसी संघाने राजस्थान युनायटेड एफसी संघाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करत पूर्ण गुण वसूल केले.
चंद्राने ओडिसाला आघाडी मिळवून दिली होती. चंद्राचा हा गोल तिसऱ्या मिनिटाला नोंदविला गेला. मध्यंतरापर्यंत ओडिसाने राजस्थानवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. 52 व्या मिनिटाला डेंझीलने राजस्थानला बरोबरी साधून दिली. 64 व्या मिनिटाला राहुल मुखीने ओडिसाचा दुसरा आणि निर्णायक गोल करून राजस्थानचे आव्हान संपुष्टात आणले.









