वृत्तसंस्था / भुवनेश्वर
भारताच्या राष्ट्रीय खो-खो संघाला ओडीशा शासनाने आता 3 वर्षांच्या कालावधीसाठी पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खो-खो या क्रीडा प्रकाराला अधिक प्राधान्य मिळण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय ओडीशा शासनाने घेतला आहे.
भारताच्या राष्ट्रीय खो-खो संघासाठी ओडीशा शासनातर्फे प्रत्येक वर्षी 5 कोटी रुपयांची रक्कम गुंतविली जाईल. जानेवारी 2025 ते डिसेंबर 2027 अशा तीन वर्षांच्या कालावधीसाठी ओडीशा शासनाने हा नवा करार केला आहे. एकूण पुरस्कर्त्याचे पॅकेज 3 वर्षांसाठी 15 कोटी रुपयांचे राहिल. ओडीशा शासनाने खो-खो प्रमाणेच हॉकीलाही प्राधान्य दिले आहे. हॉकी इंडिया बरोबर ओडीशा शासनाने यापूर्वीच भागिदारीचा करार केला आहे. नवी दिल्लीत 13 ते 19 जानेवारी दरम्यान पहिली विश्व चषक ख्,ो!00045खो स्पर्धा होणार आहे.









