चुकीच्या सवयींमुळे अनारोग्याच्या समस्यांमध्ये वाढ

प्रतिनिधी /बेळगाव
निरोगी जीवनशैली आवश्यक आहे. परंतु, आपल्या चुकीच्या सवयींमुळे आपणच अनारोग्याच्या समस्या निर्माण करून घेतो. अलीकडच्या काळात पूर्वी न जाणवणारे बरेचसे आजार उद्भवत आहेत. त्यापैकीच एक आहे लिव्हरची म्हणजेच यकृताची समस्या. यकृत हा शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. आपले अन्न पचविण्याचे व मुख्य म्हणजे रक्त शुद्ध करण्याचे काम यकृत करत असते. परंतु, अलीकडे यकृताला सूज येण्याचे प्रकार वाढले आहेत.
एका 35 वषीय स्त्राrचे लग्न होऊन पंधरा वर्षे झाली आहेत. ती डॉक्टरकडे गेली असता तिला ‘फॅटी लिव्हर’ असल्याचे निदान झाले. एक सॉफ्टवेअर इंजिनिअर वर्क फ्रॉम होम करत असताना अचानक त्याला भूक कमी होण्याची तक्रार सुरू झाली. तपासणीमध्ये फॅटी लिव्हर आढळून आले.
फॅटी लिव्हर म्हणजे काय?
फॅटी लिव्हर हा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज नावाच्या गंभीर स्थितीचा पहिला टप्पा आहे. अलीकडच्या काळात त्याचे प्रमाण वाढले आहे. जगभरात यकृत समस्या व यकृत प्रत्यारोपणाचे कारणसुद्धा हेच आहे. जगभरात याचा प्रसार 9 ते 30 टक्के व भारतात 24 टक्के इतका आहे. फॅटी लिव्हरवरून आपल्या लक्षात येते की, आपल्या आहारातून शरीरात जाणारे फॅट वेगवेगळय़ा अवयवांमध्ये जमा होऊन बसते. पण जेव्हा लिव्हरमध्ये मर्यादेपेक्षा जास्त फॅट जमा होऊ लागते, तेव्हा ते यकृताच्या कार्यप्रणालीत बाधा आणू शकते.
अल्कोहोलिक फॅटी लिव्हर ही समस्या जे नियमितपणे दारूचे सेवन करतात, त्यांच्यामध्ये आढळते. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर समस्या ज्यांना मधुमेह किंवा लिव्हर सोरायसीस असे आजार आहेत, त्यांच्यामध्ये निर्माण होण्याची शक्मयता असते.
जीवनशैलीत बदल, पूर्वापार खात असलेल्या अन्नामध्ये बदल, बैठी जीवनशैली, जंकफूड व फास्टफूडचे सेवन ही याची कारणे आहेत. त्याबरोबरच मधुमेह, बीपी, हृदयाशी संबंधित अन्य रोग व स्थूलत्व, विशेषतः पोटावरील चरबीचे स्थूलत्व यासारख्या आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात. मद्यपानामुळे यकृताच्या समस्या उद्भवून शेवटी यकृत निकामी होते.
यकृताच्या कार्यावर होतो परिणाम
पोटावर साचलेल्या चरबीमुळे यकृताच्या कार्यावर परिणाम होतो व कालांतराने यकृत निकामी होऊन यकृताचा सोरायसीस, कर्करोग होऊ शकतो. या आजारामध्ये प्रारंभीच्या काळात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. परंतु, हळूहळू पोटदुखी, मळमळ, भूक कमी होणे अशी लक्षणे दिसू लागतात. रोग वाढल्यावर काविळ होणे, पोटात सूज येणे, रक्ताच्या उलटय़ा होणे ही लक्षणे दिसतात. सुदैवाने हा रोग फॅटी लिव्हर या टप्प्यावर असल्यास बरा होऊ शकतो. यासाठी योग्य चाचणी म्हणजे हायब्रो स्कॅन; ज्यामुळे फॅटी लिव्हरचे निदान होऊ शकते.
याच्या पहिल्या टप्प्यात आहारतज्ञांनी सुचविलेला आहार सेवन करून, योग्य क्यायाम करून पूर्णपणे आराम मिळू शकतो. फॅटी लिव्हरचा दुसरा टप्पा म्हणजे हिपेटायटीस व सोरायसीस. हे मात्र पूर्णतः बरे होण्याची शक्मयता कमी आहे. काविळ, पोटाला सूज येणे, रक्ताच्या उलटय़ा होणे अशी लक्षणे आढळल्यास औषधोपचार गरजेचे असून उपचारांनी नियंत्रण आणल्यावर यकृत प्रत्यारोपण करता येते.
केएलईमध्ये गॅस्ट्रोइंट्रॉलॉजी विभाग गेली कित्येक वर्षे या रोगाबद्दल जागरुकता निर्माण करीत आहे. प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपचार आहे. अभ्यासानुसार भारतात दरवषी दहा लाख लोकांना यकृताचा रोग होतो. त्यामुळे वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. यकृत निरोगी राहण्यासाठी बीट, लसूण, कोथिंबिर, हळद, आले असे पदार्थ उपयोगी ठरतात. वास्तविक चौरस आणि समतोल आहार अनेक आजारांना दूर ठेवू शकतो.
फास्टफूड, रेडी टू इट फूड, सोडा आणि सॉफ्टड्रिंक्स, मद्यपान यापासून जितके दूर राहता येईल, तितके यकृताचेच नव्हे तर अन्य आजारांपासूनही आपण दूर राहू शकतो. आहार आणि वेळच्या वेळीच तज्ञांचे मार्गदर्शन यामुळे आपण सर्वच आजारांवर मात करू शकतो.
आरोग्यदायी आहार
- आरोग्यदायी आहार म्हणजे प्रोटिन्सचे प्रमाण वाढवून कर्बोदके व तेलकट पदार्थ कमी करणे
- हिरव्या पालेभाज्या भरपूर खाणे
- जंकफूड, तळलेले पदार्थ टाळणे
- जेवणात डाळी, बार्ली व नाचणीचा वापर करणे
- पाणी भरपूर पिणे
फॅटी लिव्हरसाठी व्यायाम
- दररोज 40 ते 45 मिनिटे व्यायाम करणे किंवा दर आठवडय़ाला एकूण 150 मिनिटे व्यायाम करणे
- चालणे, जॉगिंग, धावणे, पोहणे व एरोबिक्स हे सर्व चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आहेत.









