दत्तगुऊ वझे यांचे प्रतिपादन : वाळपई हनुमान विद्यालयात जनजागृती
वाळपई : रस्त्यावर दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येमध्ये वाढ होऊ लागलेली आहे. सुरक्षा कायद्याचे पालन होत नाही बेशिस्तपणे वाहने चालविल्यामुळे अशा अपघातामध्ये वाढ होऊ लागलेली आहे. यावर नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने हेल्मेटचा वापर करावा, वाहतूक खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन दत्तगुऊ वझे यांनी केले आहे. रस्त्यावरील सुरक्षेबद्दल दत्तगुरू वझे यांचा आगळा वेगळा उपक्रम आयोजित करून जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. वझे यांनी ‘दुचाकीचा सुरक्षित वापर’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी जुलै 2018 ते नोव्हेंबर 2019 या काळात वाळपई, होंडा, आमोणा, वेलगे, माशेल, ओल्ड गोवा, मंगेशी, रायबंदर, दोनापावला वगैरे मिळून सुमारे 30 माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालय मिळून 3000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना दृक – श्राव्य (ऑडिओ व्हीजुअल) द्वारे सादरीकरण व मार्गदर्शन केले आहे. वझे यांना तो नवीन शैक्षणिक वर्षामध्ये पुन्हा सुरू करायचा आहे. ज्या शाळांना / संस्थांना याचा लाभ करून घ्यायचा आहे असेल त्यांनी 9850477966 या नंबरवर संपर्क साधावा असे वझे यांनी आवाहन केले आहे.









