सांगली : महाराष्ट्रातील सर्व ओ.बी.सी समाजाचे ओ.बी.सी आरक्षण काल न्यायालयाने पुर्वी प्रमाणे 27 टक्के द्यावे असा निर्णय दिला. आरक्षण संदर्भात ओ.बी.सी. व्हिजेएनटी बहुजन परिषद या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी ओ.बी.सी.कल्याण मंत्री विजय वडेट्टीवर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर ओबीसी आंदोलन ओबीसी मेळावे ओबीसी महाअधिवेशन घेऊन राज्यभर लढा दिला. व आयोग स्थापन करून ओबीसी समाजाला न्याय देण्याचे काम केल. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने निकाल ओ.बी.सी समाजाच्या बाजुने दिला. याबद्दल महाराष्ट्रातील ओबीसी बांधव यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालय व महविकास आघाडी महाराष्ट्र शासनाला धन्यवाद देत आहेत, असे उद्गार ओबीसी संघटक ओबीसी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय विभुते यांनी सांगली येथील बैठकीत काढले.
विभूते म्हणाले, ही लढाई अजून संपलेली नाही भविष्यात आपल्याला जो पर्यंत लोकसभेत आणि राज्य सभेत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत लढा चालूच ठेववां लागेल या साठी गाव निहाय ओबीसी ची बांधणी करून सर्वांना एक करूया या साठी सर्व समाजाला सर्व ओबीसी बांधवांना बरोबर घ्यावे असे आवाहन केले. या लढाईसाठी ज्या ज्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले त्यांचे आभार मानले.
राज्य समन्वय अरूण खरमाटे म्हणाले, राज्यामध्ये ओबीसी संघटना संघर्षाची भूमिका घेतल्यामुळे यश संपादन झाले. येणाऱ्या 7 ऑगस्टला पुणे येथे मंडल दिना निमित्त होणाऱ्या मेळाव्यास सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो ओबीसी बांधणीसाठी जायचं आहे.
यावेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान म्हणाले, आरक्षणाचे महत्त्व खूप आहे. आरक्षणामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळतो. यासाठी समाजाने इथून पुढच्या लढ्यात एकसंघ राहण्याचे गरज आहे. नगरसेवक विष्णू माने म्हणाले संघटित राहून ओबीसी चे अनेक प्रश्न अनेक समस्या आपणाला भविष्यामध्ये सोडवण्याचे आहे .
स्वागत प्रास्ताविक सुनील गुरव यांनी केले.
या बैठकीसाठी नगरसेवक संतोष पाटील, नगरसेवक मनोज सरगर, अमर निंबाळकर, राज्य प्रवक संग्राम माने राज्य महिला प्रतिनिधी अर्चना पांचाळ, बांधकाम सभापती जगन्नाथ माळी,जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत गायकवाड, दिनकर पतंगे, धनपाल माळी, आनंदराव वाघमोडे, इब्राहिम नदाफ, सोमनाथ पाटील, जयश्री पाटील, सुनिता बालगाव, त्याचबरोबर पलूसचे अध्यक्ष महेश सुतार राजेंद्र तेली भिलवडीचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, बाळासाहेब कुंभार नागनाथ सुतार सचिव शरद झेंडे महिला प्रतिनिधी रंजना माळी, प्रमिला महानुर, अर्चना शेंडगे, सोनाली कुरणे उपस्थित होते. आभार जत तालुका अध्यक्ष सागर शिणगारे यांनी मानले.
Previous Articleएक ऑगस्टला एक लाख शाळांमध्ये होणार भारतमाता प्रतिमापूजन
Next Article मराठा आरक्षणासह इतर प्रश्न मार्गी लावा








