Green Moong Dosa: बऱ्याच वेळेला सकाळच्या नाश्त्याला रोज- रोज काय करायचं असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडत असतो. आणि त्यात रविवारी डोसा, इडली यांसारखा बेत केला जातो. पण दररोजच्या नाश्त्यात बदल म्हणून आणि एक वेगळी चव घेण्यासाठी मुगाचा डोसा ट्राय करायला काही हरकत नाही. जो डोसा पौष्टिक आणि चविष्ट देखील आहे. चला तर जाणून घेऊयात याची रेसिपी
डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
एक वाटी हिरवे मूग
अर्धी वाटी तांदूळ
पाव वाटी पोहे
२ चमचे रवा
४ हिरव्या मिरच्या
४- ५ लसणाच्या पाकळ्या
कोथिंबीर
पाणी
मीठ
तेल
कृती
डोसे बनवण्यासाठी मूग ,तांदूळ आणि पोहे ६ तास भिजत ठेवावेत. हे सर्व भिजल्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्यावं.मिश्रण वाटून घेताना त्यात थोडं – थोडं पाणी घालून डोस्यासाठी लागणाऱ्या बॅटर प्रमाणे हे मिश्रण करून घ्यावं. तयार झालेल्या मिश्रणात २ चमचे रवा घालावा आणि मिश्रण १० मिनिटे झाकुन ठेवावं. नंतर हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर वाटून घेऊन मिश्रणात घालाव्यात. यानंतर याचे डोसे करून घ्यावेत.तयार झालेले गरमागरम आणि स्वादिष्ट डोसे तुम्ही सॉस सोबत सर्व्ह करू शकता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









