रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूल येथील पोषण आहाराच्या दर्जाबाबत येथील पालक संघटना आक्रमक झाली आहे. येत्या आठ ते पंधरा दिवसामध्ये पोषण आहार सुधारण्याबाबत गांभीर्याने दखल न घेतल्यास पटवर्धन हायस्कूलचे सर्व पालक व विद्यार्थी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा पालक संघटनेने दिला आहे.
शहरातील पटवर्धन हायस्कूल येथील इयत्ता ५ ते ८ वीच्या सर्व वर्गाना दर दिवशी पोषण आहार दिला जात होता. हा पोषण आहार पूर्वी याच शाळेतमध्ये शिजवून मुलांना दिला जायचा. मध्यंतरी शाळेत पोषण आहार शिजवला जायचा तो आता केंद्र सरकार पुरस्कृतचे टेंडर घेतलेल्या संस्कृती बचत गटाच्या पाटील ( तासगाव- सांगली) यांनी ठेका घेऊन चालवण्यास सुरुवात केली आहे. या गटाच्या पोषण आहाराबाबत पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या खूप तक्रारी होत्या. पोषण आहार पाऊण तास उशिरा येणे , कमी पडणे , भात कच्चा असणे, अति शिजणे, वरण , आमटी पातळ असणे, बेचव असणे, अशा तक्रारी पालकांतर्फे मांडण्यात आल्या.
तर पालक, विद्यार्थ्यांचे उपोषण
या विषयाची गांर्भीयाने दखल न घेतल्यास आम्ही पटवर्धन हायस्कूलचे सर्व पालक व विद्यार्थी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा पालक संघटने दिला आहे. यावेळी पालक शिक्षक प्रतिनिधी संघटना उपाध्यक्ष प्रदीप सुर्वे, भावना पाटील, विनय मुकादम , सतीश पाडळकर, .प्रशांत देवस्थळी, वैदुला घाणेकर, तेंडुलकर, पालक प्रतिनिधी प्रिया कुलापकर, वैदही पटवर्धन, दीप्ती कुवळेकर, सुनील किर, रामदास चव्हाण, विक्रम लाड, विजय गोताड, प्रियांका शिवलकर, तुलसी गोताड, मांडवकर, कल्पना थळी, प्रणाली भिडे, निशिगंधा तोडणकर, आनंद मुळये, श्वेता किनरे, प्रणोती रांगणकर, रचना राऊत, आसावरी जामसंडेकर, भालचद्र कोकरे, काळे, अभिजीत करंबेळकर, श्रेया शिवलकर, पूजा जाधव, सर्व पालक प्रतिनिधी तसेच इतर पालक वर्ग उपस्थित होता.
पाटील यांनी मागितली माफी
संस्कृती बचतगटाच्या पाटील यांच्याशी पोषण आहार संदर्भात संपर्क साधण्यात आला. त्यांनी पटवर्धन हायस्कूलमध्ये येऊन प्रथम पालक प्रतिनिधी संघटना यांच्याशी दिलगिरी व्यक्त केली. त्यासंदर्भात केलेल्या चर्चेनंतर यापुढे अशी चूकी आमच्याकडून होणार नाही याची दक्षता घेऊ. व येत्या आठ ते पंधरा दिवसामध्ये पोषण आहार सुधारला जाईल असे लेखी लिहून देऊन असे आश्वासन दिले आहे.
Previous Articleविशांत गावडे यांच्या माटोळीला दुसरे बक्षीस
Next Article पंचसदस्य गोविंद फात्रेकर यांचा गौरव









