छोरी 2 चित्रपटात साकारतेय मुख्य भूमिका
बॉलिवूड कलाकार स्वतःच्या चित्रपटासाठी मोठी मेहनत करत असतात. चित्रिकरणाच्या सेटवर कलाकारांच्या सुरक्षेची पूर्ण व्यवस्था केलेली असते. तरीही अनेकदा कलाकार जखमी होत असतात. अनेकदा तर चित्रिकरणादरम्यान झालेल्या दुर्घटनांदरम्यान कलाकारांचा जीवच धोक्यात आलेला असतो. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री नुसरत भरुचा सोबत घडला आहे.

नुसरत सध्या स्वतःचा आगामी चित्रपट ‘छोरी 2’चे चित्रिकरण करत आहे. यादरम्यान ऍक्शन दृश्य करताना ती जखमी झाली आहे. तिच्या चेहऱयाला ईजा झाल्याची माहिती सह-कलाकार इशिता राजने दिली आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला असून यात नुसरतवर उपचार सुरू असल्याचे दिसून येते.
नुसरतने देखील स्वतःच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती डॉक्टरच्या क्लीनिकमध्ये दिसून येते. छोरी 2 या चित्रपटात नुसरत मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. नुसरतसोबत या चित्रपटात सोहा अली खानही काम करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया करत आहेत. तर नुसरत याचबरोबर ‘सेल्फी’ आणि ‘अकेली’ यासारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे.









