अशा मागण्यांसाठी परिचारिकांचे राज्यभर आंदोलन
कोल्हापूरात परिचारिका आंदोलन, ४०० परिचारिका सहभागी
कोल्हापूर
राज्यातील शासकीय रुग्णालयात वर्षापासून रखडलेली परिचारकांची पदभरती तात्काळ करावी. सध्या काम करणाऱ्या परिचारिकांवरील ताण कमी करून त्यांची आर्थिक आणि शारिरीक पिळवणूक थांबवावी यांसह अन्य मागण्यासाठी आज राज्यभरातील परिचारकांनी एक दिवसीय काम बंद आंदोलन केलं.
कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील ४०० हून अधिक परिचारक या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहेत. परिचारकांनी शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. असं एक दिवसीय काम बंद आंदोलन सरकारला जाग आणण्यासाठी असून मागण्यांची दखल घेतली नाही तर येत्या काळात बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशाराही यावेळीस कोल्हापुरातील आंदोलन परिचारकांनी दिला आहे. दरम्यान या एक दिवसीय काम बंद आंदोलनामुळे सीपीआर रुग्णालयातील रुग्ण सेवेवर देखील अंशताहा परिणाम झाला.
Previous Articleदहावी परीक्षा उद्यापासून
Next Article शहर विकास आराखड्यासाठी हरकती मागवल्या








