तासगाव: एका महिलेने नर्स असल्याचे भासवून येथील डॉ.अंजली पाटील यांच्या सरस्वती आनंद या हॉस्पिटलमधून एक दिवसाच्या चिमूरड्याचे अपहरण केले. ही महिला सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून रविवारी सकाळी आठच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील सिद्धेश्वर चौका नजीक डॉ.अंजली पाटील यांचे सरस्वती आनंद हे प्रसुती हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये एका महिलेची कालच प्रसूती झाली होती. आज रविवारी (ता.24) रोजी सकाळी आठच्या दरम्यान एक महिला नर्स असल्याचे भासवून संबंधितांच्या वार्डमध्ये गेली. तेथून एक दिवसाच्या चिमूरड्याला घेऊन तिने आपल्या जवळील बॅगमध्ये ठेवले व क्षणार्धात त्या महिलेने तेथून पलायन केले. या घटनेचे वृत्त समजतात शहरात एकच खळबळ उडाली आहे.तर पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.महिलेचा शोध तासगाव पोलीस करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









