सातारा :
नुकताच मान्सूनपूर्व पावसाचा ९ दिवसांचा महिमा कमी झाला असला तरी उकाडा पुन्हा बाढू लागला आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याने सरपटणारे प्राणी हे लपलेले बाहेर पडू लागले आहेत. त्यांच्यापैकी विंचवाचे दर्शन साताऱ्यातील डान्सर ग्रुपला चारभिंतीच्या परिसरात झाले. त्यांनी सोशल मीडियावर व्हीडिओ करुन त्याची माहिती सातारकरांना दिली. चार भिंतीवर दररोज अनेकजण जातात. गप्पा मारत अनेकजण पाय सोडून कट्यावर बसतात. तर काहीजण नजिकच्या झाडीत गुलुगुलू बोलत बसतात. त्याचबरोबर काहींना तर भानच नसते की आपण कुठे बसलेलो आहोत, अशा सातारकरांना मात्र सध्याच्या वातावरणात साप, विंचू यांचा धोका आहे, असेही त्या डान्सर ग्रुपच्यावतीने भीती व्यक्त करण्यात आली आहे.
साताऱ्यात नुकताच ९ ते १० दिवस अवकाळी पाऊस चांगला पडला. त्या पावसाची उघडीप गेल्या दोन दिवसांपासून घेतली असून त्या उघडीपीबरोबर पुन्हा उकाडा जाणवू लागला आहे. पावसामुळे लपून राहिलेले सरपटणारे प्राणी हे बाढलेल्या धगीने बाहेर पडू लागले आहेत. त्यापैकीच विंचवाचे दर्शन साताऱ्यातील डान्सर ग्रुपचे मोनिश अवघडे व त्यांचे मित्र धीरज पाटोळे, अक्षय बनारे, श्रीधर पाटोळे, आदित्य गायकवाड आणि राहुल निकम यांना झाले. त्यांनी एक व्हीडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करत आवाहन केले. तरीही साताऱ्यातील सातारकर हे दिवसा व सायंकाळी उशिरापर्यंत चार भिंती परिसरात मोठ्या प्रमाणात भटकताना दिसतात.
- प्रशासनानेच दखल घ्यावी
मोनिश हे एक कलाकार तसेच डान्सर आहेत. ते विविध कलापथकात सहभागी असतात. त्यांनी मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना असे सांगितले की स्मारकांचा सन्मान राखताना आपल्या सुरक्षिततेचाही विचार करणे आवश्यक आहे. एकीकडे आपण हुतात्म्यांच्या स्मृती जपतो, तर दुसरीकडे अशा ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो, हे दुर्दैवी आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि योग्य ती पावले उचलावीत, असे त्यांनी सांगितले.








