वृत्तसंस्था/मुंबई
भारतातील 5-जी वापरकर्त्यांची संख्या 365 दशलक्ष इतका आकडा गाठू शकली आहे. तीन वर्षांपूर्वी लाँच केल्यानंतर 5-जी वापरकर्त्यांच्या संख्येमध्ये 35 टक्क्यांची वाढ झाली असल्याचे इंडिया रेटींग्स आणि रिसर्च यांच्या अहवालात म्हटले आहे.
मासिक डाटा वापरात वाढ
आर्थिक वर्ष 2019 मध्ये 6 ते 11 जीबी इतका डाटा महिन्याला वापरला जात होता तो आज घडीला वाढून 18 ते 55 जीबी प्रतिमहिना इतका झाला आहे. यामध्ये ब्रॉडब्रँड ग्राहकांची संख्या वेगाने वाढलेली पहायला मिळाली. जून आणि जुलै या दोन महिन्यांमध्येच 42 लाख ग्राहक मिळविण्यामध्ये दूरसंचार विभागाला यश आले आहे. जुलै 2025 मध्ये वायरलेस आणि वायर्ड ग्राहकांची संख्या 1.22 अब्ज इतकी वाढलेली पहायला मिळाली आहे.
जियो, भारती आघाडीवर
डिसेंबर 2024 नंतर वायरलेस ग्राहकांची संख्या मासिक स्तरावर वाढली. ही संख्या 1.172 अब्जवर पोहोचली. यामध्ये पाहता रिलायन्स जियो, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडीया या तिघांनी स्पर्धेत बाजी मारली आहे.









