मोबाइल क्रमांकात ‘5’ असल्यास कंपनी देते नकार
जगात अनेक प्रकारचे लोक असतात. काही जणांना देवावर विश्वास असतो, तर काही लोक देवावर विश्वास ठेवण्यासह अंधश्रद्धेलाही खतपाणी घालत असतात. असे लोक मोठय़ा पदावर पोहोचले तरीही ते जाणूनबुजून किंवा अजाणतेपोटी इतरांचे नुकसान करतात. चीनमध्ये एक अंधश्रद्धाळू कंपनी काही विशेष लोकांना मुलाखतीची देखील संधी देत नाही.
काही लोक एका विशेष अंकाला ‘लकी’ मानत असल्याचे पाहिले असेल. परंतु याच अंकापोटी इतरांचे नुकसान करताना कुणाला पाहिले नसेल. अंधश्रद्धेचा कळस म्हणजे चीनमध्ये एका कंपनीकडून अशा अर्जदारांना नोकरीची संधी दिली जात नाही, ज्यांच्या मोबाइल क्रमांकात ‘5’ हा अंक सामील आहे. या प्रकाराची आता सोशल मीडियावर विशेष चर्चा होत आहे.

चीनच्या गुआंगडॉन्ग येथील शेंजेंनमधील एक शैक्षणिक कंपनी नोकरीस इच्छुक उमेदवारांच्या पत्रांवरून एक वेगळय़ाच प्रकारची पडताळणी करते. या पडताळणीची पद्धत ऐकून दंग व्हायला होते. कंपनी अशा अर्जदारांचे अर्ज फेटाळून लावले, ज्यांच्या मोबाइल क्रमांकात 5 हा अंक सामील आहे. कंपनी 5 हा अंक अनलकी मानते. कंपनीसोबत काम करायचे असल्यास मोबाइल क्रमांक बदलावा लागेल असे उमेदवारांना सांगण्यात येते. कंपनीची ही अजब अट ऐकून लोक चकित होतात, कारण या गोष्टींचा त्यांच्या पात्रतेशी कुठलेच देणेघेणे नसते.
अंधश्रद्धेचा कळस
कंपनीची ही अंधश्रद्धा सोशल मीडियावर चर्चेत आहे. 21 व्या शतकातही अशाप्रकारच्या अंधश्रद्धा दिसून येत असल्यास कंपनीने कर्मचारी नव्हे तर फेंग शुई मास्टरच नोकरीवर ठेवावेत अशी उपरोधिक टिप्पणी एका युजरने केली आहे.









