किम जोंग उन यांनी घेतला सोहळ्यात भाग
वृत्तसंस्था / प्योंगयांग
उत्तर कोरियाने स्वत:च्या पहिल्या ‘सामरिक आण्विक पाणबुडी’चे सादरीकरण केले आहे. कोरियन उपखंड अन् जपान यांच्यादरम्यान गस्त घालणाऱ्या स्वत:च्या नौदलाच्या ताफ्यात ही पाणबुडी सोपविण्यात आली आहे.

उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी पाणबुडी जलावतरण सोहळ्यात भाग घेतला आहे. पाणबुडीला नौदलाच्या ताफ्यात सामील करत देशाने सागरी सामर्थ्याला मजबूत करण्यासाठी एका नव्या अध्यायाची सुरुवात केल्याचे उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्याकडून म्हटले गेले आहे.
नौदलाला आण्विक शस्त्रास्त्रांनी युक्त करणे एक आवश्यक कार्य होते. पाणबुडी क्रमांक 841 ला उत्तर कोरियाच्या ऐतिहासिक व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे. या पाणबुडीला किम कुन ओके यांचे नाव मिळाले आहे. ही पाणबुडी नौदलाच्या मुख्य आक्रमक साधनांपैकी एक म्हणून स्वत:च्या लढाऊ मोहिमेला साकार करणार असल्याचे उद्गार किम जोंग उन यांनी काढले आहेत.









