मुंबई :
शुक्रवारी मंदावलेल्या इंट्रा-डे ट्रेडमध्ये एनटीपीसीचा समभाग बीएसईवर 4 टक्क्यांनी वाढून 209.30 रुपयांच्या दशकाच्या उच्चांकावर पोहोचला. या तुलनेत सकाळी 10:51 वाजता एस अॅण्ड पी बीएसई सेन्सेक्स 0.22 टक्क्यांनी घसरला. सरकारी मालकीच्या वीज निर्मिती कंपनीचा साठा गेल्या दोन आठवड्यात 12 टक्क्यांनी वाढला आहे, याचाच हा परिणाम असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
एनटीपीसी ऑक्टोबर 2010 नंतर सध्याला सर्वोच्च पातळीवर व्यवहार करत आहे. एनटीपीसीच्या समभागात झालेल्या तीव्र वाढीमुळे कंपनीला पुन्हा 2 ट्रिलियन बाजार भांडवलमूल्य म्हणजेच जानेवारी 2008 नंतर 2 लाख कोटींचे बाजारमूल्य गाठण्यात मदत झाली आहे.
नवीकरणीय ऊर्जेपासून वीजनिर्मितीवर भर
एनटीपीसी ही भारतातील सर्वात मोठी वीज निर्मिती करणारी कंपनी आहे. ज्याची एकूण स्थापित क्षमता 69134 मेगावॅट आहे. कंपनीकडे भारतातील एकूण स्थापित क्षमतेच्या तुलनेत एनटीपीसीचा वाटा 17 टक्के आहे आणि उत्पादन वाटा 24 टक्के आहे. 2032 पर्यंत 130 जीडब्लू क्षमतेची कंपनी बनण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे, त्यापैकी 60 जीडब्लू ऊर्जा निर्मिती अक्षय उर्जेद्वारे होणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.
कोळशाचा वापर कमी करणार
कोळशापासून दूर जाण्यासाठी, कंपनी न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड सोबत संयुक्त उपक्रम स्थापन करण्याचा आणि अणुऊर्जा निर्मितीमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे.