मुंबई :
एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ नोव्हेंबरमध्ये सादर केला जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ऊर्जा क्षेत्रातील या कंपनीचा आयपीओ नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये बाजारात सादर होईल असे म्हटले जात आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 10 हजार कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. या संदर्भात आपली कागदपत्रे कंपनीने बाजारातील नियामक सेबीकडे सादर केली आहेत. कंपनी लवकरच भारतातील मुंबईसह सिंगापूर या ठिकाणी एक रोड शोही आयोजित करेल.









