बेळगाव – पदवी परीक्षांना ६ ते ८ महिने उलटून गेले तरी निकाल जाहीर न करणार्या शासनाचे व सर्व विश्वविद्यालयाचा धोरणाच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेने आज राज्यभरात निदर्शने केली. २०२२-२३ या वर्षासाठी मॅट्रिकपूर्व आणि मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांच्या शिष्यवेतनासाठी पोर्टलच्या माध्यमातून पोर्टलवर अर्ज सादर करण्यात आला आहे परंतु अद्याप विद्यार्थ्यांचा प्रशिक्षणार्थी वेतन जमा झालेले नाही. ग्रामीण भागात वेळेत बससेवा नाही. ही समस्या देखील दूर करावी. विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्याची घोषणा करून बस पासच्या दरात वाढ करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला देण्यात आले. यावेळी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Articleघाटकोपरमधील पारेख रुग्णालयाला लागलेली आग आटोक्यात; एकाचा मृत्यू
Next Article अमिताभ गुप्ता यांची पुन्हा बदली









