वार्ताहर /म्हार्दोळ
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रियोळ, फोंडा येथे नृत्यांगण अकादमी, प्रियोळ यांच्यातर्फे नुकताच ’नृत्यांजली 2022’ हा भरटनाटय़म नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला.
व्यासपीठावर गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारणी समितीचे अध्यक्ष अशोक नाईक गुरव, उत्सव समितीचे अध्यक्ष सिद्धेश प्रियोळकर, अशोक गुरव, संजय नाईक, रुपेश देवीदास, शशिकांत गावडे, उपाध्यक्ष विशाल प्रियोळकर व इतर मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी नृत्यांगण अकादमीच्या 25 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. गुरू वंदना, देवी स्तुती, जथीस्वरम, कीर्तनम, तिल्लाना यासारखे भरतनाटय़मधील विविध नृत्यप्रकार येथे सादर करण्यात आले.









