एप्रिल ते ऑक्टोबर 2024 मधील आकडेवारी : आरबीआय अहवालात माहिती
नवी दिल्ली :
विदेशी भारतीयांनी आर्थिक वर्ष 2025 मध्ये एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान अनिवासी भारतीय (एनआरआय) ठेव योजनांमध्ये जवळपास 12 अब्ज डॉलर जमा केले आहेत. मंगळवारी रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ही रक्कम गेल्या वर्षी याच कालावधीत जमा करण्यात आलेल्या रकमेच्या जवळपास दुप्पट आहे. एप्रिल-ऑक्टोबर 2024 या कालावधीत एनआरआय योजनांमधील ठेवी 11.89 अब्ज डॉलर होत्या, गेल्या वर्षी याच कालावधीत 6.11 अब्ज डॉलर होत्या. यासह,
ऑक्टोबर 2024 पर्यंत एकूण एनआरआय ठेवी 162.69 अब्ज डॉलरपर्यंत वाढल्या आहेत, ज्या मागील वर्षी याच कालावधीत 143.48 अब्ज डॉलर होत्या. केवळ ऑक्टोबरमध्येच विविध एनआरआय ठेव योजनांमध्ये 1 बिलियन डॉलरपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली आहे.









