अहिल्या परकाळे,कोल्हापूर
कोरोनाच्या कालावधीमध्ये एमपीएससी आणि युपीएससीच्या परीक्षा झाल्या नाहीत.या कालावधीमध्ये ज्या परीक्षार्थींची वयोमर्यादा संपून गेली होती, अशा विद्यार्थ्यांना सरकारने वयासाठीची अट शिथिल केल्याने अशा विद्यार्थ्यांना आता परीक्षा देता येणार आहे.यामुळे त्यांचे होणारे संभाव्य नुकसान टळले आहे.
गेल्या दोन वर्षापुर्वी कोरोनामुळे या परीक्षा पुढे ढकलल्या.यामध्ये वय निघून गेलेले विद्यार्थी हतबल झाले.परंतू वाया गेलेली वर्षे सरकारने वाढवून दिल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.15 सप्टेंबरला युपीएससीची मुख्य परीक्षा असल्याने आता विद्यार्थ्यांना तीन महिन्याचा कालावधी अभ्यासासाठी मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आता टेन्शन फ्री झाले आहेत.
क्रमिक विषयाबरोबर चालू घडामोडीवर देश-विदेशातील कोणत्याही विषयाचा प्रश्न येवू शकतो.त्यामुळे परीक्षेची तारीख जाहीर होताच विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून अभ्यासाला सुरूवात केली आहे.यूपीएससी परीक्षेला क्रमिक पुस्तकांसह चालू घडामोडींचा अभ्यासही अतिशय बारकाईने करावा लागतो.अभ्यासाबरोबर स्मार्ट स्टडीची जोडही द्यावी लागते.एवढे करूनही निकाल मात्र पाच ते दहा टक्केच लागतो. उत्तीर्ण होण्याची खात्री असली तरी अपयश पदरी पडतेच.अशावेळी खचून न जाता तेवढ्याच जोमाने अभ्यासाची तयारी करावी लागते. तसेच प्री-आयएएस सेंटरसह खासगी शिकवणीवालेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात सतर्क झाले आहेत.
या तारखांना होणार परीक्षा
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने यूपीएससीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.प्राथमिक परीक्षा 28 मे रोजी असून यूपीएससी मुख्य परीक्षा 15 सप्टेंबर रोजी होणार आहे.परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांनी नियोजनपूर्वक अभ्यासाला सुरूवात केली आहे.प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा,सराव पेपर कसे आणि वेळेत कसे सोडवायचेयाचे याचे वेळापत्रक तयार करूनच किमान दिवसातील 10 तास अभ्यास करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला असल्याचे सांगितले.
यूपीएससी प्राथमिक परीक्षा प्रश्न आणि गुण
यूपीएससीच्या प्रिलियम परीक्षेला इतिहास,भुगोल,राज्यशास्त्र,अर्थशास्त्र,कृषी,पर्यावरण, चालू घडामोडी, विज्ञान तंत्रज्ञान या विषयावर पहिल्या पेपरला 100 प्रश्न 200 गुण असतात. दुसऱ्या पेपरला अंकगणित,आकलन,बुध्दीमत्ता, निर्णय क्षमता या विषयावर 80 प्रश्न 200 गुण असतात. या पेपरला किमान 66 गुण मिळाले तरच पहिल्या पेपरची उत्तरे समजतात.या पेपरला निगेटिव्ह मार्किंग असल्याने हा पेपर अभ्यास करूनच लिहावा लागतो.
यूपीएससी मुख्य परीक्षा
यूपीएससी मुख्य परीक्षेला 25 विषयांपैकी एक ऑप्शनल विषय निवडायचा असतो.हा पेपर 500 गुणांसाठी असतो.भाषा विषयाचे दोन निबंध असतात.यामध्ये इंग्रजी अनिवार्य असतो.दोन्ही निबंधापैकी दुसरा निबंध ग्राह्या धरला जातो.सामान्य अध्ययनला चार पेपर असतात.पहिल्या पेपरला इतिहास, संस्कृती आणि भूगोल विषयांसाठी 250 गुण असतात.दुसऱ्या पेपरला प्रशासन,संविधान राज्यशास्त्र,सामाजिक न्याय,आंतरराष्ट्रीय संबंध या विषयावर 250 गुण असतात.तंत्रज्ञान, आर्थिक विकास,जैवविविधता,पर्यावरण,आपत्कालीन व्यवस्थापन विषयावर 250 गुण तर इथिक्स पेपरला 250 गुण असतात. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर 250 गुणांची मुलाखत असते.
विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करावे
युपीएससीच्या अभ्यासाला जास्त वेळ मिळाला असल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करावे.क्रमिक पुस्तकांचे वाचन करून, जास्तीत जास्त सराव पेपर सोडवावे. तसेच ग्रुप डिस्कशन आणि सेल्फ स्टडीवर भर द्यावा.
प्रा. जॉर्ज क्रूज (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक)
सराव पेपर सोडवण्यावर भर देतो
प्रिलियम परीक्षा झाल्यानंतर मेन्स परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी नोटस काढल्या असून सातत्याने वाचतो.मेन्स लेखी परीक्षा असल्याने जास्तीत जास्त सराव पेपर सोडवण्यावर भर दिला आहे.नुसते वाचून चालणार नाही तर लिहिण्याचा सराव असला पाहिजे.प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या सरावाने उत्तराचे मुद्दे आठवतात,प्रत्येक प्रश्नाचे उत्तर वेळेत आणि योग्य शब्दांची निवड करून लिहिता येते.दिवसातील आठ ते दहा तास अभ्यास करून दररोज चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंग्रजी पेपरचे वाचन करतो.
मयूर पाटील (विद्यार्थी, प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटर, कोल्हापूर)
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









