विद्याधर पिंपळे,कोल्हापूर
प्रत्येक सॉफ्टवेअरमधील होणारी वेळेची बचत, कमी खर्च व सॉफ्टवेअरमधील अॅडव्हॉन्स टेक्नॉलॉजीबरोबर, एकाच प्लॅटफार्मवर आणलेल्या स्मार्ट अॅपच्या युगात आता सर्वसामान्यांचा प्रवास सुरू आहे. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ ही नवीन प्रणाली आता स्मार्ट अॅपच्या युगात दाखल झाली आहे. ही प्रणाली स्मार्ट अॅपचा पाया ठरली आहे. सर्व क्षेत्रातील ज्ञानाचे भांडार या डेटामध्ये संकलित केले जात आहे. स्मार्टफोनद्वारे याचा वापर सर्व क्षेत्रात विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स उपकरणामध्ये वाढू लागला आहे. सध्याचे जग आता स्मार्ट अॅपच्या युगात वावरू लागले आहे.
पासवर्डसह सॉफ्टवेअर, हार्डवेअर व सेन्सरचा वापर करून, स्मार्ट अॅपचा वैयक्तिरित्या वापर होऊ लागला आहे. यामध्ये वाहन, शिक्षण, उद्योग, शेती, औषध आदी क्षेत्रात स्मार्टफोनद्वारे स्मार्ट अॅपचा वापर वाढत आहे. आपले वाहन कोठे, आहे, वेग किती, चोरी झाल्यास त्याचे लोकेशन कोठे, आदी माहिती आपल्या स्मार्ट फोनवर तात्काळ उपलब्ध होत आहे. आपण ऑफीसमध्ये वा घराबाहेर असल्यास घरातील फॅन, वॉशिंग मशिन वा एअर कंडीशन मशिन आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूवर नियंत्रित करू शकतो. अशा सोयीचे तंत्रज्ञान पुढे येऊ लागले आहे. आपल्या हातातील स्मार्ट वॉचमध्ये आपल्या आरोग्याची माहिती तात्काळ उपलब्ध होत आहे.
घरगुती वापरामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये, स्मार्ट अॅप्लिकेशनचे सॉफ्टवेअर व सेन्सरचा वापर केला आहे. या उपकरणाला तात्काळ सूचना वा संदेश मिळून पुढील प्रक्रिया सुरू होते. आपण बंगल्याच्या दारात आल्यास गेटवरील लाईटस् आपोआप सुरू होतात. घरातील वॉश बेसिनमधील कॉकसमोर हात ठेवल्यास पाणी आपोआप सुरू होते. यामुळे आवश्यक तेवढ्या पाण्याचा वापर होऊन पाण्याची बचत होते. विमानसेवेमध्ये स्मार्ट अॅप ट्रॅकिंगचा वापर होत आहे. विमानतळावरील वातावरण, दृश्य, धोका याची माहिती तात्काळ मिळते. हजारो सेंसरचा डाटा स्मार्ट अॅपमध्ये एकत्रित केलेला असतो. वेब, स्मार्टफोन ते मल्टी चॅनेल अॅप्सच्या लहरीवर हे काम केले जात आहे.
इंटरनेट ऑफ थिंग्ज या सॉफ्टवेअरसह नेटवर्कींग व डेटा प्रोसेसिंगचा समावेश आहे. स्मार्ट अॅपचे मोठी स्टोरेज क्षमता, विश्लेषण, जीवनशैलीचा वापर हे वैशिष्ट्या आहे. 2018 पर्यंत जागतिक स्तरावर मोठ्या संस्थांमध्ये 50 टक्के इतका स्मार्ट अॅपचा वापर होत असे. 2020 नंतर जगातील डेटा दर दोन महिन्यांनी दुप्पट होऊ लागला आहे. त्यामुळे 2030 पर्यंत 25.4 अब्ज लोकांकडून फक्त स्मार्ट अॅपचाच वापर होईल, असे संकेत मिळत आहेत. स्मार्ट अॅप हे बुध्दीमान सॉफ्टवेअरचे पुढचे पाऊल आहे, हे मात्र खरे ठरत आहे.
जागेवर बसूनच इलेक्ट्रॅानिक्स वस्तूंचे कंट्रोल ठेवता येणार
आपण कोठेही असो, पण घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे कंट्रोल बाहेरून करू शकतो. वायफाय एनेबल स्मार्ट प्रोसेसमुळे व त्यातील सेंन्सरमुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर कोठे, केव्हा, कधीही नियंत्रण ठेवू लागलो आहोत. आपल्या स्मार्ट फोनव्दारे याचे नियंत्रण करू शकतो. हे स्मार्ट अॅप आता फायद्याचे ठरू लागले आहे.
-निलेश शहा, नॉव्हेल अप्लाईज
Previous Articleवेंगुर्लेत १३ मे रोजी खुल्या ‘युनिक कपल २०२३’ स्पर्धेचे आयोजन
Next Article 40 पेक्षा जास्त आमदार अजितदादांसोबत जाऊ शकतात









