Now Sawantwadi city will be pollution free by electric garbage carts
सावंतवाडी शहर प्रदूषण मुक्त राहण्यासाठी सावंतवाडी पालिकेने पावले उचलली आहेत. सावंतवाडी पालिका आता कचरा गोळा करण्यासाठी कचरा वाहतूक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करणार आहेत . सावंतवाडी नगरपालिकेने आमदार निधीतून इलेक्ट्रिक कचरागाडी खरेदी करण्यासाठी पाठवलेल्या अर्जाला आज प्रशासकीय मान्यता मिळाली असून , त्यासाठी ६ गाड्या खरेदी करण्यासाठी १८. ६० लाख रुपये निधी मिळणार असल्याची माहिती नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी पांडुरंग नाटेकर , रसिका नाडकर्णी यांनी दिली आहे .
सावंतवाडी / प्रतिनिधी









