निकृष्ट दर्जाच्या पशुखाद्याचा शेतकऱ्यांना फटका : दर्जा टिकविण्यासाठी निर्णय, विनापरवाना उत्पादक विक्रेत्यांवर कारवाई
बेळगाव : पशुखाद्यामध्ये गुणवत्ता आणि दर्जा टिकून राहावा, यासाठी पशुखाद्य उत्पादक आणि विक्रेत्यांना परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आली आहे. जनावरांना सकस आहार उपलब्ध व्हावा, यासाठी पशुसंगोपनने हा निर्णय घेतला आहे. परवानगीविना पशुखाद्य उत्पादन करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. पशुसंगोपनने एक पथक सज्ज केले आहे, अशी माहिती पशुसंगोपनने दिली आहे. जिल्ह्dयात 28 लाखाहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, गाढव, घोडा, मांजर, शेळ्या, मेंढ्या, कुत्रा, मांजर, डुक्कर, ससा आदींचा समावेश आहे. यापैकी गाय, म्हैस, बैल, घोडा आणि शेळ्या मेंढ्यांना सकस आहार म्हणून पशुखाद्य दिलो जाते. मात्र अलीकडे भेसळयुक्त पशुखाद्याची विक्री वाढली आहे. त्यामुळे पशुखाद्याच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे जनावरांना चांगल्या दर्जाचे पशुखाद्य उपलब्ध व्हावे, याकरिता परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. संबंधित उत्पादक व विक्रेत्यांनी परवानगीसाठी sान्asप्ग्ह्ल्.sाrन्ग्म.क्araहूक्a.ग्ह या वेबसाईटवर अर्ज दाखल करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अलीकडे शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुभत्या जनावरांची संख्या वाढली आहे. पशुखाद्य म्हणून भुसा, पेंड, कुळीथ, मका भरडा, तूर चुनी, कोंडा दिला जातो. मात्र या खाद्यांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढू लागले आहेत. याला आळा घालण्यासाठी पशुसंगोपनने भरारी पथकदेखील सज्ज केले आहे. याद्वारे उत्पादन करणाऱ्या फॅक्टरी आणि पशुखाद्यांच्या दुकानांमध्ये तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, विना परवानगी विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. दमदार पावसाला सुरुवात झाल्याने पशुखाद्य खराब होण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे पशुखाद्याची काळजी घेणेदेखील आवशक आहे. गोडावूनमध्ये साठा करून ठेवलेल्या पशुखाद्याला बुरशी, अळी लागत असते, असे पशुखाद्य जनावरांसाठी धोकादायक ठरते. शिवाय निकृष्ट दर्जाच्या पशुखाद्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो. यासाठी पशुखाद्याला परवानगी आवश्यक करण्यात आली आहे.
सेवासिंधू पोर्टलवर ऑनलाईन अर्ज दाखल करा
पशुखाद्याचा दर्जा टिकून रहावा आणि खाद्यातील भेसळ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उत्पादकांना आणि विक्रेत्यांना परवानगी घेणे आवश्यक आहे. विनापरवानगी विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. परवानगीसाठी सेवासिंधू पोर्टलवर ऑनलाईन अर्ज दाखल करावेत.
– डॉ. आनंद पाटील (तालुका पशु वैद्यकीय अधिकारी)









