बोगसगिरीला बसणार चाप
प्रतिनिधी/ मुंबई
सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारतर्फे केवायसी बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यामुळे काही लाडक्या बहिणींनासुद्धा याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेविषयी सरकार दरबारी नवीन निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रत्येक लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याविषयीची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. पात्र महिलांनी फार काळ ही प्रक्रिया रेंगाळत न ठेवता तातडीने ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महिलांना सीएससी सेंटरवरून अथवा स्वत: ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी करता येईल. या प्रक्रियेत लाभार्थी महिलेचे नाव, पत्ता, आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाची माहिती भरावी लागेल. ही प्रक्रिया सुरू होताच रेंगाळत न राहता ईकेवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









