आरबीआयची बंदी : सोन्याचे वजन व शुद्धतेबाबत अनियमितता आढळल्याने निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयआयएफएल फायनान्स यापुढे नवीन सुवर्ण कर्ज देऊ शकणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने त्यावर तत्काळ बंदी घातली आहे. आरबीआयला गोल्ड लोन पोर्टफोलिओमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत. तथापि, कंपनी विद्यमान गोल्ड लोन ग्राहकांना सेवा देणे सुरू ठेवण्यास सक्षम असेल.
आरबीआयने सांगितले ‘गेल्या काही महिन्यांपासून सेंट्रल बँक कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापन आणि लेखा परीक्षकांशी या उणीवांवर चर्चा करत होती, परंतु आजपर्यंत कोणतीही अर्थपूर्ण सुधारात्मक कारवाई झालेली नाही. अशा स्थितीत एकूणच ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने हे निर्बंध आवश्यक होते.’
कंपनीच्या 2600 हून अधिक शाखा
कंपनीच्या 500 हून अधिक शहरांमध्ये 2600 हून अधिक शाखा आहेत. आयआयएफएल फायनान्स लिमिटेड ही एक वित्तीय सेवा कंपनी आहे. आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड, आयआयएफएल समस्त फायनान्स लिमिटेड आणि आयआयएफएल ओपन फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड या त्याच्या सहाय्यक कंपन्यांसह विविध प्रकारचे कर्ज देते.
यामध्ये गृहकर्ज, सुवर्ण कर्ज, व्यवसाय कर्ज, मालमत्तेवरील कर्ज आणि मायक्रो फायनान्स यासारख्या कर्जांचा समावेश आहे. कंपनीच्या 500 हून अधिक शहरांमध्ये 2600 हून अधिक शाखा आहेत ज्याद्वारे ती आपली सेवा प्रदान करते.
समभाग घसरणीसह बंद
आयआयएफएलचे समभाग सोमवारी 3.94 टक्क्यांनी घसरत 598 रुपयांवर बंद झाले. गेल्या एका वर्षात स्टॉकने 31.75 टक्के परतावा दिला आहे. या वर्षी स्टॉक -0.79 टक्के घसरला आहे. गेल्या 5 वर्षात शेअर 226.53 टक्के इतका दमदारत वाढला आहे.
आरबीआय तपासणीत
गोल्ड लोनमध्ये 4 प्रमुख कमतरता
?कर्ज मंजुरीच्या वेळी सोन्याची शुद्धता व वजन तपासण्यात अनियमितता आणि लिलावात चूक झाली.
?कर्ज-ते-मूल्य गुणोत्तराचेही उल्लंघन होत होते. म्हणजेच मर्यादेपेक्षा जास्त कर्ज वाटप केले जात होते.
?कंपनी कर्ज वितरण आणि रोखीने वसूल करण्याच्या मर्यादेचे उल्लंघन करत होती.
?आरबीआयला शुल्क इत्यादींमध्ये पारदर्शकतेचा अभाव आढळला. ग्राहकांच्या खात्यावर शुल्क आकारले जाते.









