बेळगाव : विद्युतबिल, घरपट्टी, पाणीपट्टी व इतर बिले जमा करण्यासाठी नवनवीन सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. घरबसल्या सर्व बिले भरता येवू शकतात, पण पावती मिळत नसल्याने संबंधीत कार्यालयात किंवा बेळगाव वन कार्यालयात बिले भरण्यासाठी धाव घेतात. उपनगरातील नागरिकांना शहरात यावे लागत असल्याने वडगाव-येळळूररोड परिसरात बेळगाव वनची शाखा सुरू करण्यात आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्वामी विवेकानंद मार्गावरील महापालिकेच्या जुन्या इमारतीत बेळगाव वन कार्यालय असून, याठिकाणी शहरातील नागरिक घरपट्टी, पाणीपट्टी, लाईट बिल व इतर बिले भरण्यासाठी येत असतात. त्याचप्रमाणे अशोकनगर, टीव्ही सेंटर, आणि गोवावेस येथे बेळगाव वन कार्यालय आहे. यामध्ये आता आणखीन एका शाखेची भर पडली आहे. वडगाव, अनगोळ, टिळकवाडी परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्याच्यादृष्टीने वडगाव येथील येळ्ळूररोडवर बेळगाव वन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सोयीचे बनले आहे. शहापूर, टिळकवाडी, अनगोळ परिसरातील नागरिकांना लाईटबिल व इतर बिले भरण्यासाठी गोवावेस येथील महापालिका व्यापारी संकुलातील बेळगाव वन कार्यालयात यावे लागते. त्यामुळे वरील परिसरातील नागरिकांसाठी येळ्ळूररोडवर बेळगाव वन शाखेची सुऊवात करण्यात आली आहे. वडगाव मुख्य रस्त्याशेजारी असलेल्या व्यापारी संकुलात बेळगाव वन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या परिसरातील नागरिकांना बेळगाव वन कार्यालयात बिले भरण्यास सोयीचे ठरणार आहे.
Previous Article‘त्या’ धोकादायक भुयारी गटारीबाबत प्रशासन ढिम्म
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









