कोल्हापूर / इंंद्रजित गडकरी :
पर्यावरण साखळीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या चिमण्यांना वाचविण्यासाठी आता जगभर चळवळ सुरु झाली आहे. या चळवळीत अनेक देशांनी सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे, भारताने यात पुढाकार घेतला असून आज २० रोजी जागतिक चिमणी दिनानिमित मुंबईत चिमणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका, मध्य आशिया आणि युरोपातील दिग्गज देशांचा सहभाग असलेली ही १७ वी चिमणी परिषद मुंबईतील बीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आयोजित केली आहे. नाशिकची नेचर फॉरेव्हर संस्था या आयोजनामागे आहे. तर, बर्ल्ड स्पॅरो डे सेक्रेटरिट ही संस्था सहआयोजक आहे.
दिल्ली येथे २०१० मध्ये या परिषदेचा प्रारंभ झाला. दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी या परिषदेला उपस्थिती लावली. त्यांनी या परिषदेच्या निमित्ताने चिमणीला दिल्लीचा राज्यपक्षी म्हणून घोषित केले. त्यानंतर इतर चिमणी परिषदा मुंबईत पार पडल्या. या परिषदेला संयुक्त राष्ट्रसंघाची इकोसिस्टिीम रीस्टोरेशन ही संस्था आर्थिक सहकार्य करत आहे. आज २० मार्च रोजी होणाऱ्या परिषदेचे सहप्रायोजकत्व महाराष्ट्र सरकारचा बनविभाग, मुंबई महानगरपालिका आणि ‘द मुंबई बॉटेनिकल गार्डन अॅन्ड झू’ आणि ‘विप्रो’ यांनी स्वीकारले आहे. नाशिकची नेचर फॉरएव्हर सोसायटी ही चिमण्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. २०१६ पासून ‘आय लव्ह स्पॅरो” नावाचा उपक्रम ही संस्था राबवत आहे. या उपक्रमांतर्गत चिमण्यांबाबतची जनजागृती केली जाते. शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येते.
मुंबईत होणाऱ्या परिषदेत जगभरात चिमणी संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेण्यात येणार आहे भविष्यातील चिमण्या संवर्धनाच्या उपाययोजनांची चर्चा केली जाणार आहे. ‘स्पॅरोमॅन ऑ फ इंडिया” म्हणून ओळखले जाणारे जागतिक पातळीवरील पक्षीतज्ज्ञ मोहम्मद दिलावर यांनी याबाबतची माहिती ‘तरुण भारत संवाद ला दिली.
- चिमणी दिवस कधीपासून ?
पहिला चिमणी दिवस 20 मार्च 2010 रोजी साजरा केला. भारतातील नेचर फॉर एव्हर सोसायटी ऑफ इंडिया आणि इको–सिस अॅक्शन फाउंडेशन (फ्रांन्स) यांनी या दिवसाची सुरूवात केली. त्यानंतर जगभरातील विविध संस्था यामध्ये सहभागी झाल्या
- चिमणी संरक्षणासाठी आपण काय करू शकतो ?
घराच्या छतावर किंवा अंगणात गवत, फुलझाडे आणि लहान झाडे असलेली जागा आपण उपलब्ध कऊ शकतो. पाण्याच्या स्त्राsतांसोबत त्यांना कृत्रिम घरट्यांची सोय करु शकतो.
- चिमण्या जपणे काळाची गरज
चिमण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे चिमणी जगली पाहिजे. चिमणीसारख्या लहान पक्ष्यांच्या संरक्षणातून पर्यावरणाचा सर्वांगीण विकास आणि समतोल राखला जातो.
– महमद दिलावर जागतिक किर्तीचे पक्षी तज्ज्ञ व नेचर फॉरेव्हर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष
- कोल्हापुरात टोन जातींच्या चिमण्या
कोल्हापूरमध्ये चिमण्यांच्या दोन मुख्य प्रजाती आहेत. त्यापैकी हाऊस चिमणी ही राखाडी रंग आणि काळी चोच असणारी चिमणी घरे, शाळा, बाजारपेठ आणि मोकळ्या जागी आढळते. दुसरी ‘इंडियन सिल्वर बिल्ल” या प्रजातीची चिमणी कोल्हापुरात तुलनेत कमी आढळते. वाढते प्रदूषण, मोबाईल टॉवरची संख्या, आधुनिक इमारती यामुळे चिमण्या शहरांतून गायब होऊ लागल्या आहेत. चिमण्या कमी झाल्याचा तोटा काय? चिमण्या पिकांवरील कीड खाऊन पिकांचे संरक्षण करतात. झाडांच्या बियांचा चिमण्यांमुळे प्रसार होतो. पण आता चिमण्यांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाल्यामुळे या निसगर्चक्रावर परिणाम होऊ लागला आहे.








