भोगावतीची निवडणूक प्रक्रिया 25 पासून चालू; 20 नोव्हेंबर रोजी निकाल
भोगावती प्रतिनिधी
जिल्ह्यातील भोगावती आणि बिद्री साखर कारखान्याचा निवणुक कार्यक्रम गुरुवारी सहकार निवडूक प्राधिकरणाने जाहीर केला. त्यानुसार भोगावती साखर कारखान्यासाठी 19 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार असून 20 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. बिद्री साखर कारखान्यासाठी 3 डिसेंबर 2023 रोजी मतदान आणि 5 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. भोगवतीच्या निवडणुक प्रक्रीयेस 25 ऑक्टोबर तर बिद्रीच्या निवडणुक प्रक्रीयेस 26 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. निवडणुकशाहूनगर परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याची जूनपासून अर्धवट राहिलेली पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया 25 आक्टोबरपासून पुन्हा सुरु होत आहे. 19 नोव्हेंबरला मतदान आणि 20 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याचे गुरुवारी निवडणूक विभागाने जाहीर केले आहे.
गेल्या मे महिन्यामध्ये या कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता.सभासद पक्की यादी आणि उमेदवारी अर्ज अंतिम तारखेपर्यंत कार्यक्रम सुरळीत पार पडला.मात्र त्यानंतर पुढील प्रक्रियेच्या दरम्यान पावसाळा व अतिवृष्टीची शक्यता गृहीत धरून हा कार्यक्रम उमेदवार छाननी पर्यंत स्थगित करण्यात आला होता.30 सप्टेंबर नंतर या पुढील निवडणुकीचा टप्पा जाहीर करण्यात येईल असे निवडणूक विभागाने घोषित केले होते.
त्यानुसार उमेदवारी अर्ज छाननी पासून मतदानापर्यंतची प्रक्रिया जाहीर केली आहे.येत्या 25 तारखेला छानणी, 26 ला वैध यादी प्रसिध्द याच दिवसापासून 9 नोव्हेंबर पर्यंत माघार, 10 रोजी निवडणूक लढविण्राया उमेदवारांची अंतीम यादी जाहीर व चिन्हे वाटप होईल.19 तारखेला मतदान होईल व 20 नोव्हेंबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर होईल.असा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.









